Home चंद्रपूर इम्पॅक्ट :-भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या बातमीने प्रशासनावर बचत गटांना रक्कम परत...

इम्पॅक्ट :-भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या बातमीने प्रशासनावर बचत गटांना रक्कम परत करण्याची नामुष्की!

आमदार जोरगेवारांच्या चमकोगिरीसह शासनाच्या पैशाचा बट्ट्याबोळ आणला समोर, प्रदर्शनीतील गैरकारभार उघडकीमुळे प्रशासन झाले खडबडून जाग !

चंद्रपूर (प्रतिनिधी):-

“महिला सशक्तीकरण अभियान या सरकारी कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांची चमकोगिरी” या मथळ्याखाली सर्वप्रथम भुमिपुत्राची हाक या न्युज पोर्टल वर वृत्त प्रकाशित करून शासकीय निधीची होणारी उधळपट्टी व आम. किशोर जोरगेवार यांच्या चमकोगिरी वर प्रकाश टाकला होता. या वृत्ताने प्रशासन खडबडून जागे झाले व तिन दिवसीय कार्यक्रमात स्टाल लावण्यासाठी बचतगटांनी दिलेली रक्कम परत करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. शासकीय नियमानुसार स्टॉल चे शुल्क 1000 रुपये घ्यावयाचे होते आणि आता प्रशासनाने ते परत केले तर बचत गटांना झालेल्या नुकसानीची भरपाई कोण करणार ? की हे आकारलेले शुल्कच अवैध होते.? हा प्रश्न आता समोर येत आहे . मग प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे स्टॉल धारकांना जो मनःस्ताप आणि उत्पादित केलेला माल कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकण्याची वेळ आली, त्यामुळे आर्थिक नुकसान झाले त्यांनाही भरपाई मिळणार काय? या संपुर्ण प्रकरणाचा भुमिपूत्राची हाक पर्दाफाश करणार असून वृत्ताच्या माध्यमातून समाजाला व प्रशासनाला आरसा दाखविण्याचे आपले कार्य प्रामाणिकपणे पुढे नेणार आहे.

सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यात महिलांचा सर्वांगिन विकास व्हावा व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे संयुक्त विद्यमाने चांदा क्लब ग्राउंड येथे नवतेजस्विनी प्रदर्शन व विक्री यासह उदयोजक महिला व विशिष्ठ काम करणाऱ्या महिलांचा गौरव, महिलांकरिता पारंपारिक क्रीडा स्पर्धाचे महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व महिला बचत गटांच्या महिला व त्यांचे कुटुंबीय आर्थिक सुदृढ व्हावे या सार्थ हेतूने दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत तिन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे संयुक्त विद्यमाने चांदा क्लब ग्राउंड येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला बचत गटांना प्रोत्साहन व रोजगार उपलब्ध या हेतूने जवळपास ५० बचत गटांनी प्रत्येकी १०००/- रू. भरून स्टाल लावले. या कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार झाला नाही शिवाय शासकीय योजनेबाबतीत महामंडळाची उदासिनता यामुळे या तिन दिवसीय कार्यक्रमाला सामान्य जणांनी पाठ फिरवली त्यामुळे बचत गटांनी लावलेल्या स्टाल वर ग्राहक फिरकले नाही व बचत गटांनी बनविलेल्या साहित्यांची विक्री तर झाली नाही, मुनाफा (लाभ)ही मिळाला नाही, उलट ते साहित्य बचत गटांना निकृष्ट झाल्यामुळे फेकून द्यावे लागले. भुमिपुत्राची हाक ने वृत्ताच्या माध्यमातून हा प्रश्न लावून धरल्यामुळे जवळपास ५० महिला बचत गटांना स्टाल ची भरलेली रक्कम परत करण्यात आली, परंतु बचत गटांना झालेल्या नुकसानी ला जबाबदार कोण ? चमकोगिरी करणारे आम. जोरगेवार यांना समोर करण्यासाठी पडद्यामागची भुमिका बजावणारे शासकीय कर्मचारी यांची विशेष समिती नेमून चौकशी करण्यात यावी, यासाठी भुमिपुत्राची हाक आपली मागणी वृत्ताच्या माध्यमातून रेटून लावणार आहे.

कार्यक्रम जिल्हा स्थरावरचा आणि दाखवला चंद्रपूर तालुक्याचा?

आमदार किशोर जोरगेवार यांनी महिलांसाठी आपला नियोजित कार्यक्रम हा आझाद बगीचा येथे घेण्याचे ठरवले असल्याचे बोलल्या जातं आहे पण महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून होतं असलेल्या कार्यक्रमात पण आपली उपस्थिती ही राजकीय फायदा पोहचून देणारी ठरणार असल्याने त्यांनी जिल्हा स्थरावरचा कार्यक्रम हा तालुक्याचा दाखवून त्या कार्यक्रमात स्वतःचे फोटो झळकवले व मंडप खर्चाचा निधी स्वतः मंडप डेकोरेशन चे सामान पोहचवून ते पैसे स्वतःकडे ठेवले, दरम्यान अनेक बचत गटांच्या महिलांनी कार्यक्रमात गर्दी नसल्याने व त्यांच्या वस्तू विकल्या गेल्या नसल्याने त्या फेकून स्टॉल सोडून आपल्या घरी परतल्या, खरं तर हा कार्यक्रम जिल्ह्याचा असतांना किशोर जोरगेवार यांनी हा कार्यक्रम मुद्दाम तालुक्याचा दाखवला आणि बचत गटांच्या महिलांना आर्थिक भर्दंड सहन करावा लागला. त्याची नुकसान भरपाई कोण देणार हा प्रश्न उपास्थित होतं आहे, मात्र महिलांना समोर करून चमकोगिरी करणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांना याचं काहीएक सोयरसुतक नाही कारण त्यांना तर राजकारण करायचं आहे,

Previous articleलक्षवेधी:- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या ईव्हीएम प्रश्नावर फडणवीसचा संताप का ?
Next articleकायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा- ना.सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here