Home चंद्रपूर खळबळजनक :- चंद्रपूर कांग्रेस लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स का?

खळबळजनक :- चंद्रपूर कांग्रेस लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स का?

भाजप उमेदवाराचा निवडणूक फॉर्म भरण्याची कांग्रेस का पाहताहेत वाट? खळबळजनक माहिती.

चंद्रपूर :-

कांग्रेस ने राज्यातील जवळपास सगळ्याचं उमेदवाराची घोषणा केली असतांना चंद्रपूर लोकसभेच्या संभावित उमेदवारांची घोषणा करण्यात एवढा सस्पेन्स का ठेवत आहे? या प्रश्नांच उत्तर कांग्रेस चे कार्यकर्ते शोधण्याचा प्रयत्न करताहेत, पण त्यांना याबाबत अधिकृत माहिती मिळत नसताना आता मोठा गौफ्यस्फ़ोट समोर आला आहे, कारण जर या लोकसभेची उमेदवारी कांग्रेस ने त्यांच्या एका उमेदवाराला दिली तर दुसरा उमेदवार भाजपच्या तिकिटावर उमेदवारी लढविण्याची तयारी करून असल्याने हा सस्पेन्स भाजप उमेदवाराच्या नामांकन फॉर्म भरेपर्यंत राहणार असल्याची माहिती समोर येत आहे, या संदर्भात एका न्यूज पोर्टल च्या जाहीर कट्ट्यावरून दिसत आहे.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कांग्रेस विरुद्ध कांग्रेस असा शाब्दिक खाडजंगी सामना सामाजिक माध्यमावर गाजत आहे, त्यात एक पत्रक कांग्रेस च्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांनी प्रसिद्ध करून स्वतःची राजकीय वाट खडतर केली आहे, कारण ते पत्रक म्हणजे कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करणारा सकळ कुणबी समाज नसून आमदार प्रतिभा धानोरकर यांना मानणारा तो कुणबी आहे आणि सगळेच कुणबी हे त्यांना मानत नसल्याने त्या पत्रकातून कुणबी समाजाची बदनामी होतं असल्याची माहिती कांग्रेसच्या कुणबी आणि इतर आजी माजी पदाधिकारी यांनी एंडी हॉटेल मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे, दरम्यान अगोदरच आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पक्षातील नेत्यावर माझ्या पतीला मारल्याचा आरोप केला होता व आता पत्रक प्रसिद्ध करून कांग्रेस चे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर आरोप करून “चुकीला माफी नाही” असा इशारा दिला आहे, अर्थात अगोदरच आक्रमक असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना खुले आव्हान ऐन निवडणूकीच्या युद्धजन्य परिस्थितीत मिळत असल्याने त्यांनी हे आव्हान कसं संपवायचं याचं गणित मांडलं असावं अशी शक्यता आहे आणि म्हणूनच आपल्या राजकीय ताकतीच्या बळावर त्यांची रानणितीच कांग्रेस कमेटीला भारी पडत आहे, कदाचित त्यामुळेच चंद्रपूर लोकसंभा निवडणुकीत कांग्रेस चे सम्भावीत उमेदवार भाजप च्या तिकिटावर लढण्याची शक्यता पाहता शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अनुषंगाने या जागेचा सस्पेन्स कायम ठेवला जातं असल्याची माहिती समोर येत आहे.

Previous articleमोफत आरटीई प्रवेश हवा; शासनाने प्रवेशासाठी केली वयोमर्यादा जाहीर
Next articleब्रेकिंग:- अखेर चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला आमदार प्रतिभा धानोरकर यांना कांग्रेसची उमेदवारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here