Home Breaking News डॉ. आईंचवार व डॉ. पोटदुखे यांचा भाजपात प्रवेश ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी...

डॉ. आईंचवार व डॉ. पोटदुखे यांचा भाजपात प्रवेश ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले स्‍वागत

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  3 एप्रिल 2024 – गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू, श्री कन्यका नागरी सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य विजयराव आईंचवार तसेच, राजीव गांधी अभियांत्रिकी कॉलेज चंद्रपूरचे प्राचार्य डॉ. प्रवीण पोटदुखे यांनी बुधवार, 3 एप्रिल रोजी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना, मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

ना. सुधीर मुनगंटीवार यांची विकासात्‍मक दृष्‍टी आणि झंझावाती कार्यशैलीवर विश्‍वास ठेवून मागील चार-पाच दिवसात इतर पक्षांच्‍या हजारो कार्यकर्त्‍यांनी भाजपात प्रवेश केला असून त्‍यामुळे भाजपाची चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील ताकद वाढली आहे.

हॉटेल तिरुपती क्राऊन येथे आयोजित शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी बैठकीत डॉ. आईंचवार व डॉ. पोटदुखे यांनी भाजपात प्रवेश घेतला. लोकसभा निवडणुकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या विजयाकरीता पूर्ण शक्तिनिशी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here