Home चंद्रपूर लक्षवेधी :- चुकीला माफी नाही, म्हणणारे आता विजय वडेट्टीवारांना हात जोडणार का?.

लक्षवेधी :- चुकीला माफी नाही, म्हणणारे आता विजय वडेट्टीवारांना हात जोडणार का?.

विजय वडेट्टीवार सुद्धा त्या चुकीला माफी देणारं का? की बदला घेणार? याकडे लोकसभा क्षेत्रातील जनतेचे लक्ष.

लक्षवेधी :-

कांग्रेस चे विदर्भातील दिग्गज नेते म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे व जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा होऊन सुद्धा मोदी लाटेत मोठ्या मताधिक्याने निवडून येणारे कांग्रेस चे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची बदनामी करणारे एक पत्रक( चुकीला माफी नाही ) स्वयंघोषित “समस्त कुणबी समाजातील कर्त्याधर्त्या सुपारीबाजानी प्रसिद्ध करून समाजमाध्यमावर फिरवलं आणि चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांनाच मिळाली पाहिजे म्हणून काही तथाकथित कुणबी लोकांनी एकत्र येऊन विजय वडेट्टीवार यांना चॅलेंज करण्यात आलं, खरं तर विजय वडेट्टीवार हे आपला पॉवर वापरून गेम करू शकले असतें परंतु ते कांग्रेस चे जबाबदार नेते आहेत व त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही, म्हणून कांग्रेस ची उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांना मिळाली हे स्वीकारलं पाहिजे, खरं तर मागील 2019 ची लोकसभा उमेदवारी बाळू धानोरकर यांना मिळावी म्हणून आणि मिळाल्यानंतर निवडून आणण्यासाठी जीवापाड मेहनत करणाऱ्या वडेट्टीवारांचा अपमान निश्चितपणे त्यांच्या काळजाला भिडला असेल, शिवाय त्यांना मानणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना पण वेदना झाल्या असाव्यात यात शंका नाही,

धानोरकर परिवार हा कांग्रेसी कधीच नव्हता तो शिवसेनेत होता, केवळ पाच वर्षा अगोदर त्या परिवाराचा कांग्रेस मध्ये उदय झाला, परंतु लोकसभेची उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांनाच का? ही बाब गंभीर ठरत आहे, कारण अगोदरच त्यां वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार आहे मग त्यांनाच लोकसभा का लढवावी वाटते? खरं तर पक्षात अनेक नेते आहेत ज्यांना कांग्रेसने वेळोवेळी डावलले आहे, त्यांना खरं तर उमेदवारी देण्याची आवश्यकता होती, पण स्वतःच्या घरातच सर्व सत्ता मिळविण्याची धानोरकर परिवाराला जी सवय आहे ती सर्वसामान्य कांग्रेस कार्यकर्त्यांच्या राजकीय करिअरला बर्बाद करणारी ठरत आहे, कारण भद्रावती नगरपरिषद चा नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बाळू धानोरकर खासदार व त्यांची पत्नी आमदार म्हणजे सगळी पदे धानोरकर यांच्याच घरी हवी, मग समाजातील बाकीच्यांनी काय फक्त सतरंज्याचं उचलायच्या का? असा प्रश्न निर्माण होतं आहे, केवळ एका घराण्याला मोठं करण्यासाठी समाजातील इतरांचा जन्म झाला का? व त्यांनीच त्याग करायचा? पण त्या समाजातील तरुणांना नौकऱ्या नाही, त्यांना कामधंदे नाही त्यांच्यासाठी धानोरकर परिवाराचे योगदान काय? तर शून्य, पण इतर समाजातील लोकांना दोनसे, चारसे कोटी रुपयाचे ठेके देऊन कमिशन मात्र हे खाणार, मग यामध्ये समाजाचा विचार कुठे जातोय? समाजाला केवळ निवडणूकीत वापरायचं आणि नंतर सोडून द्यायचं हा जो प्रकार आहे तो समाजातील तरुणांनी समजून घ्यायला हवा.


हेही वाचा 

आश्चर्यजनक :- आमदार प्रतिभा धानोरकर यांची संपत्ती साडेचार वर्षात 40 पटीने वाढली..


विजय वाडेट्टीवार यांनी स्वतःच्या मुलींसाठी लोकसभा उमेदवारी मागितली जो कुठल्याही पक्षातील कार्यकर्त्यांचा अधिकार आहे, तस पाहता शिवानी वडेट्टीवार ह्या कांग्रेस पक्षात प्रतिभा धानोरकर नसताना पदाधिकारी होत्या व पक्षात पदाधिकारी जर कुणी असेल तर त्या उमेदवारंवार घराणेशाहीचा धब्बा लागतं नाही, त्यामुळे शिवानी वडेट्टीवार यांनी जी पक्षांकडे उमेदवारी मागितली ती त्यांच्या अधिकारात होती, उलटपक्षी जेंव्हा खासदार म्हणून बाळू धानोरकर निवडून आले त्यानंतर विधनासभा निवडणूक आली त्यावेळी प्रतिभा धानोरकर यांच्याकडे कुठलाही अनुभव नसताना व त्यांनी कधी कांग्रेस पक्षात काम केले नसताना त्यांना विधनासभेची उमेदवारी कुठल्या तत्वावर दिली याचे उत्तर धानोरकर परिवार देणारं का? मात्र बाहेरचा उमेदवार नको, आमच्या कुणबी जातीवर अन्याय आहे, ज्या थाळीत खाल्लं तिथेच घाण करण्याच्या या कृत्यांबद्दल समस्त कुणबी समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही असल्या टिका समाजातील दुदखूळे समोर करून विजय वडेट्टीवार यांच्यावर जो घनाघात केला तो माफीयोग्य मुळीच नाही, कारण विजय वडेट्टीवार हेच खरे बाळू धानोरकर यांना खासदार बनविण्यात अग्रेसर होते आणि म्हणूनच बलाढ्य असणाऱ्या भाजप उमेदवाराला त्यांनी पाणी पाजले, आज तोच धानोरकर परिवार समाजातील लोकांना समोर करून जर विजय वडेट्टीवार यांना आव्हान देत असतील तर धानोरकर परिवाराला विजय वडेट्टीवार व त्यांचे समर्थक कधीही माफ करणार नाही हेही तेवढेच खरे, खरं तर निवडनुका येतील जातील, कुणी जिंकतील कुणी हरतील पण ज्या माणसांनी आपल्याला मोठे केले त्या माणसावर खोटे आरोप करून त्यांची सार्वजनिक बदनामी करणे म्हणजे स्वतःची वैचारिक पातळी किती खालच्या स्थरावर गेली याचा प्रत्यय येत आहे,


हे सुद्धा वाचा

लक्षवेधक :- भाजपला हरविण्याची जबाबदारी फक्त वंचित बहुजन आघाडीचीच का?


मग वडेट्टीवार त्या चुकीला माफी देणारं का?

ज्याअर्थी चुकीला माफी नाही असे पत्रक काढून एका जेष्ठ नेत्यांची जाहीर बदनामी करणारा धानोरकर परिवार जर विजय वडेट्टीवार यांच्याकडे जाऊन माफी मागणार नाही, तो पर्यंत विजय वडेट्टीवार समर्थक कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना मदत करणार नाही ही वस्तुस्थिती आहे, अर्थात ज्या विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच्या बळावर अनेक खासदार आमदार हे त्यांनी निवडून आणले, त्यांना काही काळात पक्षात आलेल्यानी आव्हान द्यावं म्हणजे स्वतःच्याचं धोबाडात मारून घेण्यासारखी स्थिती ओढवली जाऊ शकते, त्यामुळे विजय वडेट्टीवार यांना हात जोडायला ते तथाकथित समस्त कुणबी समाज जाईल, कारण कांग्रेस च्या वरिष्ठानी उमेदवाराला सांगितलंय की कुठल्याही स्थितीत विजय वडेट्टीवार यांना सन्मानजनक पद्धतीन सभेला बोलवायचं l, त्यामुळे कांग्रेस उमेदवाराकडे विजय वडेट्टीवार यांना सन्मान दिल्याशिवाय पर्याय नाही, मात्र विजय वडेट्टीवार यांच्यासारखा कनखर नेता उमेदवारांनी केलेल्या त्या बदनामीला व केलेल्या चुकीला माफी देणारं की झालेल्या बदनामीचा बदला घेणार हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here