Home चंद्रपूर संतापजनक :- अँड सातपुते यांनी धानोरकर यांच्या प्रचारार्थ विकली तालुका समाज मंडळं?

संतापजनक :- अँड सातपुते यांनी धानोरकर यांच्या प्रचारार्थ विकली तालुका समाज मंडळं?

प्रत्येक समाज मंडळाकरिता अँड सातपुते यांनी उमेदवरांकडून 10 लाख रुपये घेतल्याचा सामाजिक माध्यमातून आरोप ?

व्हायरलं पोस्टमुळे राजुरा येथे एकावर हल्ला?

चंद्रपूर :-

राजकारणात स्वतःच्या स्वार्थासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही, कधीकाळी समाजाला दिशा देणारा व्यक्ती म्हणून अँड पुरुषोत्तम सातपुते यांच्याकडे समाजातील लोकं मोठ्या आशेने पाहत होते, त्यांना कांग्रेस कडून किंव्हा भाजप कडून लोकसभा निवडणूक सुद्धा लढविण्याची समाजाची तयारी होती, त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध सामाजिक कार्यक्रम, मेळावे व कृषी प्रदर्शनी सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यायचे, त्यामुळे निश्चितपणे त्यांच्यावर समाजाची एक भिस्त असायची पण समाजासाठी कधीही कुठलीही निस्वार्थापणे मदत न करणाऱ्या धानोरकर यांच्याकडून पैसे घेऊन समाज मंडळं अँड सातपुते यांच्याकडून मतदाणासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्यावर होतं असल्याने समाजात मोठा संताप व्यक्त होतं आहे, समाज मंडळ ही समाजाच्या उन्नतीसाठी असतात, पण त्या समाज मंडळाचा उपयोग स्वतःच्या राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी होतं असेल तर मग समाज केवळ राजकारणी लोकांना मोठं करण्यासाठी व त्यांची गुलामी करण्यासाठी आहे का? असा प्रश्न निर्माण होतं आहे, कांग्रेस ची उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर प्रतिभा धानोरकर हा कांग्रेसचा कमजोर उमेदवार असल्याची टिका करणारे अँड सातपुते यांना अचानक असा कुठला पुळका आला की ते चक्क समाज मंडळे गहाण ठेवत आहे?

मागील एक दिवसापूर्वी गडचांदूर येथे समाजाच्या मंडळाची एक बैठक झाली, दरम्यान बल्लारपूर येथे सुद्धा बैठक झाली होती, त्या बैठकीत तुम्ही प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार करा मी तुम्हाला 10 हजार प्रतिदिन प्रमाणे 10 दिवसाच्या प्रचाराचे 1 लाख देतो अशी चर्चा झाल्याची बाब सामाजिक माध्यमावर व्हायरलं होतं होतं आहे, जर एका मंडळाला 10 लाख देण्याच्या नावाखाली जर 1 लाख मिळत असतील तर मग उर्वरित पैसे कोणाकडे राहील याचा विचार समाजाच्या कार्यकर्त्यांनी करायला हवा, कारण मंडळाच्या अडोशाने स्वहीत साधल्या जातं असतील तर मग स्वहीत साधनाऱ्या तथाकथित सामाजिक नेते म्हणवून घेणाऱ्यांना उघडे पाडणे गरजेचे आहे अशा समाजातील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या आहे, समाज मंडळं ही कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही तर ती समाजाला दिशा देणारी ऊर्जेची स्रोत असायला हवी, मात्र इथे तर कुणी एक व्यक्ती निर्णय घेतो आणि संपूर्ण समाज वेठीस धरल्या जातो हे समाजहितासाठी घातक ठरत आहे.


हे सुद्धा वाचा

लक्षवेधी :- चुकीला माफी नाही, म्हणणारे आता विजय वडेट्टीवारांना हात जोडणार का?.


राजुऱ्यात कुणबी समाजात मोठी फूट एकावर हल्ला.

काल राजुरा येथे चंद्रपूर अध्यक्ष सातपुते यांची समाज माध्यमातून फिरणाऱ्या एक पोस्ट मुळे होणारी बैठक रद्द झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कुणबी समाजाच्या युवकांमध्ये राजकीय वैमनस्य उफाळून आले आहे. दरम्यान आमदार प्रतिभा धानोरकर स्पॅन्सर असलेल्या Dkpl चे संयोजक राजकुमार डाखरे हे सायंकाळी ८:१५ च्या सुमारास आपले दैनंदिन कार्यालयीन कामकाज निपटवून निरज मत्ते , सचिन भोयर, रुपेंद्र धवस मयूर झाडे यांच्याशी चर्चा करत असताना अचानकपने मागून येऊन थेट स्वप्नील पाहाणपटे नामक युवकाने जोरात गालाचा चावा घेतला, चावा एवढा भयंकर होता की दात सरळ गालात रुतल्या गेले या धाक्यातून राजकुमार सावरत नाही तोच पुन्हा स्वप्नील ने बोटाचा कडकून चावा घेतला त्यात बोटाला जबर इजा झाली व रक्तहानी होऊन बोट फ्रॅक्चर असल्याचे बोलल्या जातं आहे.

काय आहे सामाजिक माध्यमावर पोस्ट?

स्वतः च्या स्वार्था करीता 5 वर्ष धानोरकर ला शिव्या मारणारे जबरदस्तीने समाजाच्या अध्यक्ष पदावर बसलेले सातपुते यांनी काँग्रेस उमेदवाराला विकली तालुका स्तरावरील समाज मंडळे : काल झालेल्या गडचांदूर येथील बैठकीत एका व्यक्तीला दिली 1लाख (10हजार दिवस नुसार 10दिवस प्रचार ) रुपयात गाडी पाठवतो तुम्ही फिरा अशी ऑफर,


हे पण वाचा

दृष्टीक्षेप :- बाळू धानोरकरांना उमेदवारी मिळवून देणारे अँड. टेमुर्डे आता जिवंत असतें तर?


 

आता प्रश्न आहे की, काल परवा पर्यंत प्रतिभा सक्षम उमेदवार नाही म्हणणारे सातपुते चंद्रपूरातून 4 लोक घेऊन अचानक येतात व तालुका मीटिंग मध्ये लोकांना सरळ गाडी पाठवतो सोबत 10दिवसाकरिता 1लाख देतो अशी ऑफर कशी काय देतात.

तर् वरोऱ्यात चर्चा आहे की यांनी प्रत्येकी समाज मंडळाकरिता 10 लाख रुपये घेतले असून आता स्वतः च्या मर्सडीज गाडीने फिरून लोकांना मी किती समाजाचे कामं करतोय हे दाखवत असतील तर् कशी होणार समाजाची प्रगती. पुढचे 5 वर्ष साठी सातपुते कडेच समाजाचा ठेका दिलाय की काय प्रश्न पडतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here