Home वरोरा दृष्टीक्षेप :- बाळू धानोरकरांना उमेदवारी मिळवून देणारे अँड. टेमुर्डे आता जिवंत असतें...

दृष्टीक्षेप :- बाळू धानोरकरांना उमेदवारी मिळवून देणारे अँड. टेमुर्डे आता जिवंत असतें तर?

काय असती त्यांची भूमिका? धनोजे कुणबी समाजाला काय दिला असता मंत्र?

चंद्रपूर :-

“चुकीला माफी नाही.” असे पत्रक काढून कांग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना धमकीवजा इशारा देणाऱ्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना कांग्रेस ने उमेदवारी दिली खरी, पण ज्या धनोजे कुणबी समाजाच्या बळावर आपण निवडून येऊ असा समज झालेल्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या पतीला धनोजे कुणबी समाजाचे नेते ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी मागील लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली होती, मात्र “काम सरो वैद्य मरो.” या म्हणीप्रमाणे स्वर्गीय ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी मला उमेदवारी मिळवून दिली नव्हती, ते राजकीय बेरोजगार आहे, माझ्या पत्नीकडून त्यांनी पैसे नेले, मला पण पैसे मागतात असे आरोप स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्यावर लावले होते, दरम्यान बाळू धानोरकर यांना मी उमेदवारी मिळवून दिली, पण आता ते अहंकारी झाले आहे, त्यांनी अवैध कामे सुरु केले आहे, दारूची कित्तेक दुकानें उघडली आहे, असा आरोप करून ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी कांग्रेस खासदार राहुल गांधी यांना पत्र पाठवून येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी धानोरकर यांना देऊ नये अन्यथा ही लोकसभा निवडणूक कांग्रेस हरेल असे पत्रात म्हटले होते, मात्र आता बाळू धानोरकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही उमेदवारी त्यांच्याच पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना मिळाल्याने आज ॲड. मोरेश्वर टेमुर्डे असतें तर त्यांची काय भूमिका असती? यावर दृष्टिक्षेप टाकणे गरजेचे झाले आहे.

हेही वाचा 


खळबळजनक :- सामाजिक माध्यमावर एका व्हायरलं स्क्रिप्ट वरून धानोरकर परिवाराच्या रंजक पटकथा समोर.


ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेकडून झाली. शेतकरी संघटनेकडून त्यांनी दोन वेळा वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली. त्यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रतिनिधित्व केले. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच ते सक्रिय होते. 1991 -95 या काळात ते विधानसभा उपाध्यक्ष होते. नेहमी शिस्तीत राहणारे, समाजाच्या कामाकरिता सैदव तत्पर असणारे व ज्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप लागले नाही असे निष्कलंक विदर्भावादी ओबीसी नेते टेमुर्डे यांचा चंद्रपूर जिल्ह्यात एक वरिष्ठ राजकीय नेता म्हणून सगळ्याचं पक्षातील नेते आदर व्हायचा, मागील लोकसभा निवडणूकीच्या काळात जेंव्हा कांग्रेस ची उमेदवारी कुणाला मिळेल याबाबत पक्षांतर्गत लढाई सुरु होती, त्यावेळी या लोकसभा निवडणुकीत माझ्या जातीच्या बाळू धानोरकर यांना कांग्रेस कडून उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून स्वतः अँड मोरेश्वर टेमुर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांची भेट घेतली व त्यांच्या माध्यमातून कांग्रेस नेते राहुल गांधी यांना फोन गेला आणि बाळू धानोरकर यांना कांग्रेस ची उमेदवारी मिळाली ही वस्तुस्थिती आहे. पण राजकीय द्वेशापोटी स्वतः स्वर्गीय बाळू धानोरकर यांनी म्हटले होते की मला लोकसभेची कांग्रेसची उमेदवारी टेमुर्डे यांनी मिळवून दिली नव्हती. त्यामुळे बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यापासून तर खासदार म्हणून निवडून आणण्यापर्यंत अँड मोरेश्वर टेमुर्डे यांचे मोठे योगदान आहे हे कुणीही नाकारू शकत नसताना स्वतःच्या जातीच्या वरिष्ठ नेत्याला ज्या भाषेत बाळू धानोरकर यांनी शेलकी भाषेत टिका करून त्यांची उज्जत काढली, जी धनुजे कुणबी समाजाच्या संस्कृतीत बसणारी नव्हती, त्यामुळे आज अँड. मोरेश्वर टेमुर्डे जिवंत असतें तर त्यांनी किमान धनुजे कुणबी समाजातील मतदारांना सांगितले असतें की धानोरकर यांच्यावर विश्वास ठेऊ नका, कारण जेंव्हा मी स्वतः कांग्रेस ची उमेदवारी धानोरकर यांना मिळवून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी माझ्याप्रती कृतघ्नता दाखवली नाही ते तुम्हाच्याप्रती सुद्धा प्रामाणिक राहणार नाही, म्हणून समाजाचा उमेदवार जरी असला तरी त्या उमेदवाराला मतदान करू नका, असा मंत्र ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी निश्चितपणे धनुजे कुणबी समाजाला दिला असता, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here