Home चंद्रपूर सनसनीखेज:- अँड रायपुरे यांनी  कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांची काढली लायकी.

सनसनीखेज:- अँड रायपुरे यांनी  कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांची काढली लायकी.

नगरसेवक म्हणून निवडून येण्याची योग्यता नसलेल्या व्यक्तीला खासदार म्हणून कांग्रेसने का उमेदवारी दिली? संतप्त सवाल.

भद्रावती :-

लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची सध्या रनधुमाळी सुरु असताना कुठला उमेदवार प्रभावी व योग्य ठरणार याबद्दल जनतेच चर्चा सुरु असतांना आता प्रसिद्ध वकील व बिआरएसीपी नेते अँड भूपेंद्र रायपुरे यांचा व्हिडीओ सामाजिक माध्यमावर सध्या प्रचंड व्हायरलं होतं आहे, त्या व्हिडीओ मध्ये अँड भूपेंद्र रायपुरे म्हणतात की “कांग्रेस ला मत द्या, मत द्या असे म्हणतात बाकीच्यांना सोडून द्या म्हणतात, मी व्यक्तिगत टिका करत नाही, पण नगरसेवक म्हणून निवडून येण्याची ज्यांची योग्यता नाही अशा व्यक्तीला खासदार म्हणून कांग्रेस ने का उमेदवारी दिली? काय कांग्रेस कडे योग्यतेची माणसं नाही का? असा संतप्त सवाल अँड भूपेंद्र रायपुरे यांनी केला, त्यात ते पुढे म्हणतात की लोकसभेत जाण्यासाठी कांग्रेस व त्यांच्या आलायन्स कडे एकही लायक उमेदवार नसेल व एवढी नालायकी कांग्रेस कडे असेल तर मग त्या कांग्रेसच्या पाठीशी का जावं? भद्रावती तालुक्यातील एमटा च्या कंपनीकडून खासदार व त्या अगोदर आमदार असलेल्या धानोरकर यांनी किती वसुली केली ती या क्षेत्रातील लोकांना माहीत नाही का? असेही ते म्हणाले.

खरं तर अँड भूपेंद्र रायपुरे यांचा जो व्हिडीओ व्हायरलं झाला त्यात त्यांनी म्हटल्या प्रमाणे आमदार प्रतिभा धानोरकर यांचं शिक्षण व त्यांचा राजकीय आधार हा लोकसभा उमेदवारी करिता त्या पात्र आहे हे कुणी ठरवू शकत नाही, केवळ त्यांच्याकडे पैसा आहे म्ह्णून त्यांना कांग्रेस ने पुढे केले का? असा प्रश्न आता निर्माण होतं आहे, कारण त्या विद्यमान आमदार आहे त्या स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्यामुळे, तर मग खासदार यांची पत्नी आमदार व्हायला हवी का? आणि झाल्यानंतर कुठलाही अभ्यास नसताना व जनतेची कामे केली नसताना त्यांनी पुन्हा खासदारकी लढवावी का? याबद्दल विचार केला तर लोकसभेत जातांना उमेदवार हा अभ्यासू असायला हवा, त्यांना सामाजिक जाणीव असायला हवी, त्यांचा दांडगा जनसंपर्क असायला हवा पण इकडे प्रतिभा धानोरकर यांनी जनतेची कुठलीही ठोस कामे केली नाही, सभागृहात एखादा अभ्यासपूर्ण मुद्दा मांडता आला नाही तर मग त्यांना खासदार होण्याची एवढी जिद्द का? महत्वाची बाब म्हणजे कांग्रेस पक्षांकडे विजय वडेट्टीवार, विनायक बांगडे, डॉ सुरेश महाकुलकार, दिनेश चोखारे व असे अनेक कांग्रेस नेते मंडळी असतांना नवख्या असलेल्या व कोणतीही व्यक्तिगत कामगिरी केली नसताना प्रतिभा धानोरकर यांना कांग्रेसने केवळ हट्ट धरला म्हणून उमेदवारी दिली हे राजकीय दृष्टीने पक्षासाठी घातक ठरणारी आहे.

मोदी विरोधी लाट आणि कांग्रेस ला सहानुभूतीचा फायदा होणार?

देशात सध्या मोदी विरोधात लाट आहे आणि कांग्रेस ला एक प्रकाराची सहानुभूती आहे, त्यामुळे गावागावातील जनता मोठ्या अपेक्षेने कांग्रेस कडे बघत आहे, पण कांग्रेस पक्षाने उमेदवार देतांना जिल्ह्यातील नामवंत कांग्रेस नेते पदाधिकारी यांना विचारात न घेता केवळ धानोरकर यांच्या हट्टाखातीर त्यांना उमेदवारी दिली, त्यामुळे जिल्ह्यातील 50 टक्क्यापेक्षा जास्त कांग्रेस नेते पदाधिकारी नाराज आहे व ते प्रचारापासून सुद्धा दूर आहे, पण भाजप विरोधी लाट आणि कांग्रेस कडे असलेली सहानुभूती याचा सर्व्हे मध्ये अंदाज आल्याने आता मी खासदार होणारच या गुर्मीत धानोरकर यांनी पक्षातील व त्यांच्या आघाडीतील नेत्यांना पदाधिकाऱ्यांना दूर ठेवले व त्यांना सन्मान दिला नाही त्यामुळे ऐन वेळेवर कांग्रेस उमेदवार धानोरकर यांना मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

Previous articleश्री संत गजानन महाराज यांनी भक्तिमार्गाने समाजाला दिशा दिली – आ. किशोर जोरगेवार दाताडा येथे नवनिर्मित श्री संत गजानन महाराज मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम
Next articleप्रतिभाताई खासदार होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही- श्री. वडेट्टीवार,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here