Home गडचिरोली भाजप मध्ये गेलेल्या जिल्हा परिषद सदस्यांसह, नेते व पदाधिकाऱ्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी विरोधी...

भाजप मध्ये गेलेल्या जिल्हा परिषद सदस्यांसह, नेते व पदाधिकाऱ्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत घरवापसी

भुलथापामुळे भाजप मध्ये केला होता पक्षप्रवेश..

चूक लक्षात येताच दोन दिवसात ठोकला भाजपला रामराम

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर
गडचिरोली -:दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्ष सोडून भाजप नेत्यांनी दिलेल्या भूलथापांना बळी पडून भाजपात प्रवेश केलेल्या जिल्हा परिषद सदस्य, नेते , पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस मध्ये घरवापासी केली आहे. भाजप पक्षात जाऊन केलेली चूक लक्षात येताच आणि भाजपाचे वापरा आणि फेकून द्या राजकारण न पटल्याने आज राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा घर वापसी केली आहे. यामुळे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात भाजपाची गच्छंती होत असून काँग्रेस पक्षासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे चित्र आहे.

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सदस्य वैशाली किरण ताटपल्लीवार, किरण ताटपल्लीवार, घनश्याम गुरनुले या काँग्रेसच्या निष्ठावंतांना भूलथापा देऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपा प्रवेश घेण्यासाठी आग्रह केला. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर अगदी दोन दिवसातच त्यांनी भाजप सोडण्याची वेळ आली सर्वसामान्यांसाठी लढा उभारणारा धर्मनिरपेक्ष पक्ष, आणि निष्ठावंतांच्या कामाची जाणीव ठेवणारा पक्ष म्हणजे काँग्रेस त्यामुळेच हे जिल्हा परिषद सदस्य वैशाली किरण ताटपल्लीवार, तसेच राजकीय नेते किरण ताटपल्लीवार व घनश्याम गुरनुले यांनी आज घरवपसी केली.
या पक्षप्रवेशाप्रसंगी इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव कीरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे माजी जिल्हाध्यक्ष हसनजी गिलानी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleचिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात बाजार चौक नेरी येथे कॉर्नर सभा संपन्न
Next articleआरमोरी येथे भव्य बाईक रॅलीला खासदार नेते यांनी स्वतः बाईक स्वार होऊन दाखवली हिरवी झेंडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here