Home गडचिरोली लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गडचिरोली शहरात काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन रॅलीत विरोधी...

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गडचिरोली शहरात काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन रॅलीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी नृत्यात भाग घेतला

उन्हाच्या तडाख्यात देखील काँग्रेसचा धडाक्यात प्रचार

इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. किरसान यांचे प्रचारार्थ गडचिरोलीत रॅली

राजेंद्र मेश्राम

नाशिक जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

गडचिरोली -:लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आज संपूर्ण गडचिरोली शहरातून पाच किमी रॅली काढण्यात आली. उन्हाच्या कडक्यात पण काँग्रेसने धडाक्यात प्रचार केला. यात शहरातील अभिनव लॉन, आठवडी बाजार,हनुमान मंदिर,भडांगे मोहोल्ला,भोई, माळी व वंजारी समाज मोहोल्ला,राममंदिर,इंदिरा गांधी चौक,शिवाजी महाराज विद्यालय ते अभिनव लॉन अशी पदयात्रा रॅली काढण्यात आली.

या पदयात्रा रॅलीचे नेतृत्व राजाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले..रॅलीत गडचिरोली जिल्ह्यातील पारंपरिक आदिवासी नृत्यात सहभागी होत मांदरी वाद्य वाजवले. हातात काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन त्यांनी रॅलीची सुरुवात केली.इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांनी देखील विजय वडेट्टीवार यांना साथ दिली, त्यांनी देखील पक्षाचा झेंडा घेऊन नृत्यात भाग घेतला.

जिल्हाध्यक्ष काँग्रेस महेंद्र ब्राह्मणवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भाऊ कात्राटवार, आरपीआय नेते ॲड. राम मेश्राम, रोहिदासजी राऊत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद माजी पदाधिकारी, युवक काँग्रेस महिला आघाडी काँग्रेस इंडिया अलायन्स व महाविकास आघाडीचे तथा घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते ,पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने रॅली सहभागी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातून रॅली जात असताना जागोजागी नागरिकांनी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रॅली मार्गस्थ होताना नागरिकांच्या भेटी घेऊन महाविकास आघाडी उमेदवार डॉ. किरसान यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या रॅलीची सांगता अभिनव लॉन येथे सभा घेऊन करण्यात आली. सांगता सभेत डॉ. नामदेव किरसान म्हणाले की, भाजपची आता पायाखालची जमीन सरकली असून सर्वत्र जनतेत आक्रोश आहे. कार्यकर्त्यांनी आता गाफील न राहता येत्या 19 एप्रिल रोजी मतदान करावे. रॅलीच्या सांगता सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी इशारा दिला, नागरिकांनी सावधानता बाळगावी. आता हे भाजपवाले विविध आमिषे दाखवून तुमचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करतील आपण मात्र जागरूक राहून इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आणि इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here