स्वर्गीय पती, भाऊ प्रविण काकडे, भासरे अनिल धानोरकर यांच्यासह 77 लोकांकडून सुमारे 44 करोड 56 लाख 1 हजार चारशे एकोनअंशी रुपयाची ‘हात उसणवारी कशासाठी?
सर्वासामान्य माणसाच्या बिमारीसाठी हातउसने मिळत नाही तर यांना कुठलेही कारण नसताना एवढे हातउसने, आश्चर्यच.
चंद्रपूर :-
लोकसभा निवडणूकीच्या रनधुमाळीत उमेदवारांचे खाजगीतील प्रकार हे शपथ पत्र भरताना उघड येत असतें असाच एक खळबळजनक प्रकार समोर आला असून कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या शपथपत्रात आपल्या मालमत्तेची माहिती देतांना चक्क आपल्या मृत पतिकडून (सुरेश नारायण धानोरकर) 75,25,010.00 /- (अक्षरी पंचांहत्तर लक्ष पंचवीस हजार दहा रुपये) एवढी रक्कम हात उसने घेतल्याची नोंद केल्याने एकच खळबळ उडाली आहे, आता हातउसने स्वर्गातून आणले की त्यांच्या बंद पडलेल्या बैंक खात्यातून आणले हे कळायला मार्ग नाही, शिवाय त्यांचे भाऊ प्रवीण काकडे यांच्याकडून पण जवळपास 30 लाख रुपये घेतल्याची नोंद करण्यात आली आहे, आश्चर्यांची बाब म्हणजे यांना एवढी रक्कम हातउसने कशासाठी हवी याचे गणित मात्र कुठेच जुळत नाही, कुणाला एखाद्या प्लॉट खरेदीसाठी, एखादी कंपनी उभी करण्यासाठी हातउसने घेण्याची वेळ येते हे आपण बघितलं पण काहींही कारण नसताना आमदार प्रतिभा धानोरकर यांना तब्बल 77 लोकांकडून 44 कोटी पेक्षा जास्त रक्कम हात उसनी घ्यावी लागते म्हणजे “दाल मे कुछ काला है” अशी शंका वाटतं आहे, खरं तर स्वर्गीय पतिकडून चल अचल संपत्ती व मालमत्ता वारस हक्काने पत्नीलाचं होतं असतांना प्रतिभा धानोरकर यांनी कुठल्या तत्वाने व कुठल्या आधारावर व कशासाठी कशाप्रकारे मृतक पतिकडून पैसे हातउसने घेतले याबद्दल आश्चर्य व्यक्त होतं आहे,
मृतक बाळू धानोरकर यांचे अवैध धंदेवाईक यांच्याशी फार जिव्हाळ्याचे संबंध होते, मात्र त्यांच्या मृत्यू नंतर आमदार प्रतिभा धानोरकर ह्या तो कारभार पाहायच्या असा अंदाज असून त्यामुळेच अवैध व्यवसाय करणाऱ्याकडून व पती आणि भावाकडून 44 करोड 56 लाख एक हजार चारशे एकोनअंशी रुपये हातउसने घेतल्याची यादी बघून एवढा प्रचंड पैसा त्या लोकांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना कशासाठी दिला असावा की ही बाब इलेक्ट्रोल बॉण्ड सारखी आहे याचे संशोधन व्हायला हवे, ज्या व्यापाऱ्यांनी व अवैध व्यवसाईकांनी हातउसने पैसे धानोरकर यांना दिले त्या व्यापाऱ्यांनी त्या रक्कमा नेमक्या कुठून आणल्या याचा हिशोब द्यावा लागेल असे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान धानोरकरांच्या शपथपत्रातील ‘हातउसणे’ची लोकसभा मतदार संघात जोरदार चर्चा असून इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना एवढी रक्कम कशासाठी? हा प्रश्न सुद्धा उपास्थित केल्या जातं आहे. सुमारे 135 करोड रूपयेच्या वर संपत्ती असल्यांचे प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात कबुली दिली आहे. त्यांचे शपथपत्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर असून, या शपथपत्राची पिडीएफ मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे.
सर्वासामान्य माणसाला बिमारीसाठी पैसे मिळत नाही मग यांच्याकडे एवढे हातउसने?
एकीकडे अनेक बिमारीने त्रस्त लोकांना औषधं घेण्यासाठी सुद्धा हात उसने मिळत नाही तर मग यांना काहीही कारण नसताना आमदार यांना कोट्यावधी रुपयाची हातउसनवारी कशासाठी मिळते हा प्रश्नच आहे, शपथपत्रात व्यवसाय आणि शेती असा श्रीमती धानोरकर यांनी शपथपत्रात व्यवसाय आणि शेती असा उल्लेख केला आहे. आपण शेतकर्याची लेक असल्यांचे त्या भाषणात आवर्जुन सांगतात तर, विरोधक आपल्या भाषणातून त्यांच्या दारू व्यवसायाचा उल्लेख जाणीवपूर्वक करतात. श्रीमती धानोरकर यांनी आपल्या प्रापर्टीसोबतच, आपल्यावरील दायीत्वाची यादीही दिली असून, त्यात 77 लोकांकडून सुमारे 44 करोड 56 लाख एक हजार चारशे एकोनअंशी ‘हातउसणे’ घेतल्यांचे दिसत आहे. सर्वाधिक 6 करोड 46 लाख दहा हजार रूपये हातउसणे घेतले आहे तर, 10 लाख रूपयाची हातउसणे सर्वात कमी रक्कम आहे. हातउसणे देणाराची नांवे बघितल्यास, बहुतांश कोळसा व्यापारी, उद्योजक, कंत्राटदार, रेती कंत्राटदार आणि जमिनीचा व्यवसाय करणारे असल्यांचे दिसून येते. एवढ्या मोठ्या रक्कमाचे हातउसणे, श्रीमती धानोरकर यांनी शपथपत्रात दाखविल्यांने, हातउसणे देणारे अडचणीत येण्याची शक्यताही आहे. यातील अनेकजन सत्तारूढ भाजपाशी संबधीतही आहेत. ही रक्कम जाहीर झाल्यांने, आयकर विभागाचा ससेमिरा तर आपल्यामागे लागणार नाही ना अशी भीती श्रीमती धानोरकर यांना हातउसणे देणार्यांना लागत आहे.
कोण आहेत हातउसने देणारे ते महाशय?
हातउसणे देणारे आणि त्यानी दिलेली रक्कम (शपथपत्राप्रमाणे)
1. अनिल नारायण धानोरकर 10,00,000.00
2. तनिश्का ट्रेडर्स 70,00,000.003. सत्यनारायण सारडा 20,00,000.00
4. भावना मनिष पटेल 10,00,000.00
5. रामदास भिसडे 25,00,000.00
6. दामोधर सारडा 1,50,00,000.00
7. दीप ट्रान्सपोर्ट 61,85,000.00
8. दिनेश बंग 10,00.000.00
9. श्रीनिवास कन्हैयालाल बजाज 17,00,000.00
10. गजानन किराणा स्टोअर्स 80,00,000.00
11. गौरव शिव सारडा 30,00,000.00
12. गौरीशंकर ट्रेडिंग कंपनी 36,00,000.00
13. गौरीश अॅग्रो प्राय. लिमी. 4,23,00000.00
14. जय गिरनारी कन्स्ट्रक्शन 1,57,90000.00
15. किशोर फुलझेले 15,00,000.00
16. लक्ष्मण नानाजी भोयर 85,00,000.00
17. लिलादेवी दिनेश तोष्णीवाल 15,00,000.00
18. महेश बजाज 35,00,000.00
19. ममता संजय आलेवार 40,00,000.00
20. वैभव लालेंद्र लांजेवार 10,00,000.00
21. मोरेश्वर पटवा 20,00,000.00
22. नारायण आत्माराम धानोरकर 31,00,000.00
23. पी. एस. एम. कन्स्ट्रक्शन 5,50,20000.00
24. पी. एच. एम. मेटल इंडस्ट्रिज 38,47,000.00
25. नत्थू आत्माराम धानोरकर 10,00,000.00
26. प्रविण काकडे 29,83,000.00
27. राजकुमार इश्वरदास नाथनी 35,00,000.00
28. शिवनारायण सारडा 20,00,000.00
29. श्री. गणेश मार्केटींग 3,03,469.00
30. श्रीकांता नरेशकुमार बंग 15,00,000.00
31. शामसुंदर काबरा 61,00,000.00
32. सितादेवी शंकरलाल बंग 10,00,000.00
33. सुभाष ट्रेडर्स 25,00,000.00
34. सुनैना राजेश काकानी 20,00,000.00
35. सुरेश मारोतराव काकडे 1,01,38000.00
36. सुरेश नरसिंगदास सारडा 20,00,000.00
37. सुरेश नारायण धानोरकर 75,25,010.00
38. सुषमा शिवनारायण सारडा 50,00,000.00
39. सारडा यार्न एजन्सी 38,00,000.00
40. उर्मीला सत्यनारायण सारडा 20,00,000.00
41. विराट ट्रेडिंग कंपनी 1,10,00000.00
42. विवेक रमेशराव आकोजवार 80,00,000.00
43. अजय मानिकलाल गुप्ता 21,00,000.00
44. अंबीका रियल्टी 55,00,000.00
45. अमृत टेक्सटाईल्स 40,00,000.00
46. अनुसया ब्रिजमोहन पंपालीया 15,00,000.00
47. वसंत सुर्यनाथसिंह 6,46,10,000.00
48. बशिर एंटरप्राईज 59,00,000.00
49. मनोरमादेवी गिरीधरगोपाल भुतडा 10,00,000.00
50. चौधरी दिनेश गोवर्धन 10,00,000.00
51. दीपक शिवदास पटेल 15,00,000.00
52. देवेंद्र किशनगोपाल सवाना 10,00,000.00
53. दुर्गादेवी दामोधर सारडा 25,00,000.00
54. गिरीराज ब्रिजरतन कोठारी 15,00,000.00
55. गोपीचंद हिरालाल केशरवानी 10,00,000.00
56. सतिश देवीदास खासबसे 10,00,000.00
57. महेंद्र वासुदेव बावनकर 25,00,000.00
58. कन्हैया मेहाडीया 10,00,000.00
59. नोयल कन्हैयालाल मेहाडीया 25,00,000.00
60. नानेश्वर सखाराम पिंपळशेंडे 53,00,000.00
61. एन. डी. इलेक्ट्रीकल्स 1,45,00000.00
62. निकुंज हसानी 2,05,00000.00
63. पारेख त्रिभुवनदास अॅंड सन्स 15,00,000.00
64. लालजी पंजाभाई पटेल 10,00,000.00
65. पायल प्रविण सारडा 45,00,000.00
66. प्रकाश बाबुराव वैरागडे 35,00,000.00
67. प्रमोद मगरे 1,53,00000.00
68. राजकुमार रामप्रसाद जाजू 35,00,000.00
69. रामगोपाल बजाज 10,00,000.00
70. संजय प्रेमचंद सुजन 10,00,000.00
71. सरस्वती ट्रेडलिंक 10,00,000.00
72. नरसिंगदास व्यकंटलाल सारडा 10,00,000.00
73. शिल्पा जाजू 10,00,000.00
74. श्री कलेक्शन 20,00,000.00
75. श्री. शाम एंटरप्राईजेस 10,00,000.00
76. श्रीकांत रामानंदजी बजाज 15,00,000.00
77. दिपाश व्यकंट मुदलीयार 10,00,000.00