Home चंद्रपूर पोलीस कट्टा :- गोंडपिपरी ठाणेदार हत्तीगोटेचे चिरीमिरीसाठी बकऱ्या चिरडणाऱ्या ट्रक मालकाला संरक्षण?

पोलीस कट्टा :- गोंडपिपरी ठाणेदार हत्तीगोटेचे चिरीमिरीसाठी बकऱ्या चिरडणाऱ्या ट्रक मालकाला संरक्षण?

रोड धानापूर फाट्याजवळ गौरव वासेकर यांच्या 25 मार्च ला निर्मल मंडल यांची ट्रक नी तीन बोकडसह चिरडली होती एक बकरी, लाखांचे नुकसान.

चंद्रपूर /गोंडपिपरी :-

ज्या पोलिसांनी जनतेच्या हिताचे संरक्षण करायला हवे तेच जनतेच्या हक्क अधिकाराला पायदळी तुडवून त्यांच्यावरचं अन्याय करत असतील तर त्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वरिष्ठानी कारवाई करणे आवश्यक आहे, अशीच एक गंभीर घटना गोंडपिपरी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून गोंडपिपरी च्या धानापूर फाट्याजवळ निर्मल मंडल यांच्या सुरजागड येथे ट्रान्सपोर्टींग करणाऱ्या ट्रक ने 25 मार्च ला गौरव वासेकर यांच्या तीन बोकडसह एक बकरी चिरंडून मरण पावली त्याची नुकसान भरपाई मिळवून देण्याचे ठाणेदार हत्तीगोटे यांचे कर्तव्य असतांना उलट फिर्यादी यांचेवरच गुन्हा दाखल करण्याची धमकी त्यांनी दिली असल्याने फिर्यादी गौरव वासेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे, ट्रक मालक मंडल यांच्याकडून चिरीमिरी घेऊन ठाणेदार हत्तीगोटे यांनी गौरव वासेकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी म्हणजे गोंडपिपरीमध्ये बिहार राज सुरु आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

गौरव वासेकर यांची तीन बोकड व एक बकरी मरण पावली व तीन बकऱ्या गंभीर जखमी झाल्या होत्या, दरम्यान ट्रक मालक यांनी गौरव वासेकर यांना नुकसान भरपाई देतो पण पोलिसात तक्रार करू नका अशी विनंती केली असल्याने गौरव वासेकर यांनी पोलिसात तक्रार दिली नाही, परंतु आज उद्या करता करता महिना लोटून गेल्यानंतर नुकसान भरपाई मिळाली नसल्याने गौरव वासेकर हे गोंडपिपरी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची ठाणेदार हत्तीगोटे यांनी तक्रार घेतली नाही, “तुझ्या लेवल वर तू पाहून घे, तू ट्रक वाल्याना धमकी दिल्यास तुला नंगा करून मारिन व तुझ्यावर असलेल्या एनसी गुन्ह्यात तुला फसवून अटक करिन.”अशी धमकी दिली, त्यामुळे नुकसान भरपाई मिळाली नसल्याने व उलट ठाणेदार आपल्यावरच गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याने गौरव वासेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे काल तक्रार देऊन या प्रकरणी उच्चंस्तरीय चौकशी करून संबंधितावर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

गौरव वासेकर यांचे धानापूर फाट्याजवळ गोटफॉर्म असून त्यांच्याकडे जवळपास 55 बकऱ्या व बोकड आहे जे नियमित चरायला जंगल परिसरात जातात, दरम्यान चंद्रपूर सुरजागड या मार्गे लोह गिट्टी ची ट्रान्सपोर्टींग मोठ्या प्रमाणात होत असून या ट्रान्सपोर्ट मुळे छोटे मोठे नियमित अपघात होत असतात, दिनांक 10/9/2023 ला अशाच अपघातात स्वप्नील शन्कर बोपनवार यांच्या दोन मैसी मरण पावल्या होत्या, व जवळपास 1 लाख रुपयांचं नुकसान झालं होतं त्यामुळे त्यांनी याबाबत गोंडपिपरी पोलीस स्टेशनं येथे तक्रार दाखल केली, मात्र त्यां प्रकरणाची अजूनपर्यंत साधी चौकशी झाली नाही व मोबदला सुद्धा मिळाला नाही, दरम्यान गौरव वासेकर यांचे तीन बोकड व बकरी 25/3/2024 ला निर्मल मंडल यांच्या (ट्रक क्रमांक MH33T4575, MH33T4573 राहणार अल्लापल्ली जिल्हा गडचिरोली) ट्रक धडकेने मरण पावल्या या दरम्यान ट्रक मालक निर्मल यांनी मेलेल्या बोकड व बकऱ्या संदर्भात नुकसान भरपाई देतो असे म्हटले, पण आज उद्या करता करता नियमित फोनवर ते टाळाटाळ करत होते, दरम्यान गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांची सुरजागड लोह प्रकल्पात जाणाऱ्या ट्रान्सपोर्टर सोबत संबंध असल्याने त्यांनी ट्रान्सपोर्टर मंडल यांची बाजू घेऊन गौरव वासेकर यांच्यावर अन्यात केला आहे, त्यामुळे हे प्रकरण पोलीस अधीक्षक यांच्याकडे गेल्याने ठाणेदार हत्तीगोटे यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ठाणेदार हत्तीगोटे यांचे अनेक कारणामे चर्चेत असून याबाबत मोठे खुलासे होणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here