Home Breaking News शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित द्या : दिनेश चोखारे

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित द्या : दिनेश चोखारे

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

भूमिपुत्र संघटनेचे अप्पर जिल्हाधिकारी देशपांडे यांना निवेदन सादर

चंद्रपूर  :-  सन २०२२-२०२३ या वर्षाचे नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्वरित मिळावी अशी मागणी भूमिपुत्र संघटनेचे दिनेश दादापाटील चोखारे यांनी केली आहे.
भूमिपुत्र संघटनेचे आज अप्पर जिल्हाधिकारी देशपांडे यांना निवेदन सादर केले. त्यात त्यांनी म्हटले आहे,

कि, संपूर्ण जिल्ह्यात सन 2022-23 मोठ्या प्रमाणात पूर बाधित शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले होते. शासनाने यादीत तयार करताना प्रत्येक तालुक्यावर यादी तयार केली होती. शासनाचे नवीन धोरणानुसार e-KYC करणे गरजेचे होते. अनेक शेतकऱ्यांना e-KYC ची माहिती नसल्याने e-KYC करणे बाकी आहे,

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा अजूनपर्यंत e-KYC केली नसल्याने आर्थिक मदत मिळाली नाही आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी e-KYC केली त्याना सुध्दा अजून पर्यत आर्थिक मदत मिळाली नाही , लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी.

शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून e-KYC करण्यासाठी आपल्या स्तरावरून शेतकऱ्यांना माहिती देऊन ,e KYC करण्यास मदत करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देतांना सचिन राजूरकर, गणेश आवारी, प्रमोद बोरीकर, यांनी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here