Home चंद्रपूर मा.ना.सुधीर मूनगंटीवार यांचा प्रयत्नातून गाळ काढणे व विहीर खोलीकरण या उपाययोजनाकरिता निधी...

मा.ना.सुधीर मूनगंटीवार यांचा प्रयत्नातून गाळ काढणे व विहीर खोलीकरण या उपाययोजनाकरिता निधी मंजूर

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  राज्याचे वने सांस्कृतीक कार्य व मत्सव्यवसाय मंत्री मा.ना. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून चंद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पिण्याचे पाण्यांची टंचाई लक्षात घेता. टंचाई निवारण कार्यक्रम अंतर्गत पाणी टंचाई आराखडा अंतर्गत गाळ काढणे व विहीर खोलीकरण या उपाययोजनाकरिता निधी मंजूर झालेले आहे.

चंद्रपूर तालुका अंतर्गत असलेल्या गावांना योजनेचा पुरेपूर फायदा होणार आहे. चंद्रपुर तालुक्यातील पांढरकवडा, निबाळा, वायगाव, वलनी, नदगुर, मोहुर्ली, जुनोना, देवाडा, चारगाव, उसेगाव, कोसारा, दुर्गापूर, महाकुर्ला, हळदी, साखरवाही, सोनेगाव, नकोडा, आष्टी काकडे, चापराळा, मासळ विसा या २० गावांचा समावेश आहे.

विहिरीचे खोलीकरण झाल्यामुळे विहिरीतील पाणी साठा वाढेल आणि टंचाईला देखील आडा बसेल. पाण्यातील गाळ काढणे व विहिरीचे खोलीकरण करण्याच्या प्रक्रियेमुळे गावातील नागरिकांना मुबलक पिण्याचा पाण्याचा जलसाठा उपलबद्ध होईल.

शेतीपिकांसाठी देखील पाण्याची उपाययोजना करण्यास शेतकरी परिवारांना मद्दत होईल. पाणीपुरवठा योजना नागरिकान साठी अधिक महत्व पूर्ण ठरणार आहे. चंद्रपुर तालुक्यातील गावामध्ये सदर योजना राबविण्यात येणार आहे. त्याकरिता माजी समाजकल्याण सभापती तथा भाजप जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी मा.ना.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here