Home चंद्रपूर सनसनिखेज:- बाहेर जिल्ह्यातील चंद्रपुरात वाईन शॉपी, देशी दारू दुकान स्थानांतरण बेकायदेशीर ?

सनसनिखेज:- बाहेर जिल्ह्यातील चंद्रपुरात वाईन शॉपी, देशी दारू दुकान स्थानांतरण बेकायदेशीर ?

एक एक दुकान स्थानांतरण करण्यासाठी 50 ते 60 लाख रुपयाची लाच घेणाऱ्या संजय पाटील सह थोरात, अभिनंदन, पवार, क्षीरसागर व लिचडे यांचीही एसआयटी चौकशी होणार?

चंद्रपूर :-

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांना नवीन बिअर शॉपी च्या परवण्यासाठी 1 लाख रुपयाच्या लाच प्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांना लवकरच जामीन मिळाला खरा, पण चंद्रपूरात त्यांनी 400 बिअर बारला नियमबाह्य परवानगी दिली असल्याचा मुद्दा गाजत असतांनाचं आता दुसऱ्या जिल्ह्यातील ज्या वाईन शॉपी व देशी दारू दुकान चंद्रपूर जिल्ह्यात स्थानांतरण करण्यात आले ते पूर्णतः बेकायदेशीर व नियमाला बगल देऊन स्थानांतरण करण्यात आल्याचे दिसून येत आहे, कारण एखाद्या जिल्ह्यातील वाईन शॉपी किंव्हा देशी दारू दुकान दुसऱ्या जिल्ह्यात स्थानांतरण होते ते केवळ त्यांच्या मुख्य परवानाधारक किंव्हा त्यांचे ब्लड रिलेशन असणाऱ्याच्या नावानेच दुसऱ्या जिल्ह्यात स्थानांतरण केल्या जाते ही वस्तुस्थिती आहे, दरम्यान एकाच जिल्ह्यात परवाना विकायची परवानगी मिळते व त्या जिल्ह्यात किमान तीन वर्ष वाईन शॉप किंव्हा देशी दारू दुकान चालवल्या नंतरचं तो परवाना संबंधितांच्या नावाने दुसऱ्या जिल्ह्यात स्थानांतरण केल्या जातो, पण चंद्रपूर शहर, भद्रावती, ब्रम्हपुरी व इतर ठिकाणी जी बाहेर जिल्ह्यातील दुकानें स्थानांतरण करण्यात आली ती लाखों रुपयाची लाच घेऊन बेकायदेशीरपणे स्थानांतरण केली असल्याची सनसनिखेज माहिती समोर येत आहे.

एका एका देशी दारू दुकान व वाईन शॉपीचे परवाने स्थानांतरण करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक संजय पाटील, निरीक्षक थोरात, अभिनंदन, पवार, क्षीरसागर व लिचडे यांनी प्रती दुकान 50 ते 60 लाख रुपयाची लाच घेतल्याची चर्चा असतांना आता त्या दुकानांची स्थानांतरण प्रक्रियाचं चुकीची असल्याने या वाईन शॉपी व देशी दारू दुकान स्थानांतरण प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होतं आहे, दरम्यान संजय पाटील यासह दोन अधिकारी निलंबित झाले असले तरी ते केवळ तिघेच दोषी नाही तर निरीक्षक थोरात, अभिनंदन, पवार, क्षीरसागर व लिचडे हे सुद्धा तेवढेच दोषी आहे, कारण वरील सर्वांनी मिळून अहवाल तयार केला व तो अहवालचं चुकीचा असल्याने आणि त्यामुळे पैसे घेऊन परवाने दिले गेले असल्याने या सर्वांची एसआयटी चौकशी होणे गरजेचे आहे.

निरीक्षक विकास थोरात यांच्यावर त्वरित कारवाई होणे गरजेची.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नवीन किंव्हा स्थानांतरण बिअर बार, बिअर शॉपी, वाईन शॉपी, देशी दारू दुकान ला परवाने देण्यासाठी अहवाल देण्याचे काम हे निरीक्षक यांच्याकडे होते, दरम्यान वरोरा, भद्रावती, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड सिंदेवाही सावली मूल येथील देशी दारू दुकानासह बिअर बार चा अहवाल तयार करण्याचे काम विकास थोरात या निरीक्षक पदी असलेल्या व्यक्तीकडे होते मात्र त्यांनी लाखो रुपयाची लाच घेऊन बेकायदेशीरपणे अहवाल तयार केला व परवाने व मंजुरी देण्याचे काम केले, शिवाय दरमहा सगळ्या दारू व बिअर आस्थापणेकडून 5 ते 20 हजार रुपयाची वसुली सुद्धा यांच्याच मार्गदर्शनाखाली होतं आहे त्यामुळे अगोदर थोरात यांची चौकशी होणे गरजेचे आहे व त्यांच्यावर कार्यवाही होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवे, दरम्यान या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here