कांग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या त्या अनोख्या खेळीने रचला इतिहास.
चंद्रपूर :-
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा कांग्रेस च्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जवळपास अडीच लाख मताधिक्क्याने पराभव केल्याने अनेकांना सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव पचणी पडला नाही, कारण जवळपास 35 वर्ष राजकारणात असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या पद्धतीने जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले आणि जनतेच्या असंख्य प्रश्नांना त्यांनी आपल्या लढवय्या सेवाभावी स्वभावाने वाचा फोडली त्या तुलनेत आमदार प्रतिभा धानोरकर यांचे कुठलेही मोठे कार्य नसताना त्यांच्याकडून सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव होणे हे अत्यंत धक्कादायक बाब म्हणावी लागेल. मात्र याची कारणमिमांसा होणे महत्वाचे झाले आहे.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात यावर्षी सुद्धा कांग्रेस ने अभूतपूर्व यश संपादन केलं खरं, पण यावेळी ही निवडणूक एका वेगळ्या करणाने गाजली, ती म्हणजे “जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान धोक्यात येईल आणि मोदी सरकार संविधान बदलून टाकेन व मग आरक्षण पण संपेल” खरं म्हणजे कांग्रेस च्या शीर्ष नेत्यांनी पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी आणि विधितज्ञ ॲड. असिम सरोदे यांच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळण्याअगोदर गांधी चौक व न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात सभा घेतल्या व या सभामधून भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यास सुरुवात झाली. भाजपने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ज्यावेळी उमेदवारी जाहीर केली होती त्यावेळी कांग्रेसचा उमेदवार ठरायचा होता, मात्र उमेदवार ठरायच्या अगोदर भाजप विरोधात वातावरण तापायला सुरुवात झाली व सामाजिक माध्यमावर भाजप ला कांग्रेस कडून व त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्या व कार्यकर्त्याकडून ट्रोल करणे सुरु झाले. या दरम्यान कांग्रेस चा उमेदवार प्रतिभा धानोरकर की शिवानी वडेट्टीवार याबाबत शीतयुद्ध खेळलं गेलं पण शेवटी कांग्रेस च्या उमेदवारीची माळ आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या गळ्यात पडली.
भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व कांग्रेस च्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात जी लढत होईल त्यात सुधीर मुनगंटीवार हे एकतर्फी निवडणूक जिंकेल अशी चर्चा होती, कारण भाजपने “अबकी बार चारसो पार” चा नारा दिला होता त्यात ही पण शीट असेल असे सर्वाना वाटतं होते, पण कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी आणि विधितज्ञ ॲड. असिम सरोदे यांना लोकसभा क्षेत्रातील सगळ्या शहरी भागात सभा घ्यायला लावल्या व त्या सभामधून भाजपच्या संविधान विरोधी नीती विरोधात आणि मोदींचे व्यापारी धोरण, देशपातळीवर पेट्रोल, डिझेल, व गॅस सिलेंडरची दरवाढ़ आणि देशविरोधी निर्णय विषद करून त्याचे वाभाडे काढणाऱ्या अनेक बाबी उघड केल्याने मोदी विरोधात व भाजप उमेदवार विरोधात वातावरण तापवले. याचा फायदा कांग्रेस उमेदवाराला असा झाला की राष्ट्रीय पातळीवरचा असा कुठलाही बडा नेता प्रचारदारम्यान चंद्रपूरला आला नसताना केवळ पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी आणि विधितज्ञ ॲड. असिम सरोदे यांच्या सभामधून जे वातावरण निर्माण झाले त्या वातावरणातून कांग्रेस ची मोठी हवा निर्माण झाली हे कुणीही नाकारू शकत नाही.
राज्य आणि केंद्रीय सरकारच्या जनविरोधी धोरनाचा प्रचार निर्णायक ठरला?
देशात वाढलेली महागाई व बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य माणूस व युवा परेशान आहेच, पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्या प्रमाणे “जोपर्यंत गुलामाला गुलामगिरीची आठवण करून देत नाही तोपर्यंत तो बंड करून उठत नाही.” अगदी याचं वाक्याची ऱी ओढत ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी आणि विधितज्ञ ॲड. असिम सरोदे यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना जाणीव करून दिली की जर तुम्ही भाजपला मते द्याल तर देश खड्ड्यात जाईल व लोकशाही संपेल.
संभावित दारूबंदीच्या धास्तीने एक वर्ग बनला भाजप विरोधी?
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2015 मध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यात दारूबंदी केली त्यामुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढली होती व त्यांचा चंद्रपूर बाजारावर मोठा परिणाम झाला होता, आता सुधीर मुनगंटीवार पुन्हा निवडून आले तर ते पुन्हा दारूबंदी करतील ह्या अफवा कांग्रेस कडून पसरविण्यात आल्या त्यामुळे मोठया संख्येने लोकं सुधीर मुनगंटीवार यांचा व्यक्तिगत विरोध सुद्धा तयार झाला. दरम्यान लोकसभा निवडणूकीच्या मोदीच्या सभेदरम्यान त्यांनी भाषण करतांना 1984 च्या शीख दंगलीचा संदर्भ देऊन जी वाक्य बहीण भावा संदर्भात वापरली त्याचा विपर्यास केला गेला आणि महिलांमध्ये मोठा रोष निर्माण करण्यात कांग्रेस यशस्वी ठरली व त्यामुळे त्यांचा परिणाम मतदानावर झाला आणि कांग्रेसला गाव व शहरी भागात सुद्धा मोठी बढत मिळाली.