Home भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रात आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा आमदारकीच्या रिंगणात...

वरोरा विधानसभा क्षेत्रात आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा आमदारकीच्या रिंगणात ?

सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारे सुरज शहा आम आदमी पक्षांकडे मागणार उमेदवारी.

भद्रावती :-

आता लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभा निवडणूकीचे वारे वाहायला लागले असून अनेक राजकीय पक्षाचे संभावित उमेदवार आपल्या उमेदवारीसाठी पक्षांकडे मागणी करत आहे, अशातच कुठलीही राजकीय ओळख नसताना केवळ आपल्या सामाजिक कार्यातून जनसेवा साधण्याचा विडा उचलणारे सुरज शहा यांना आता आमदार पदाची निवडणूक लढवून दिल्लीत अरविंद केजरिवाल यांनी ज्या पद्धतीने जनतेला सुविधा दिल्या त्या सुविधा महाराष्ट्रात स्वतःच्या विधानसभा जनतेला द्यायच्या आहे, या क्षेत्रात जी लोकं आमदार खासदार झाली त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलं पण मी जनतेसाठी स्वतःला वाहून घेईल असं मतं त्यांनी प्रसारमाध्यमाना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.

आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी म्हटले आहे की जर पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिला तर वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रा मधून आमदारकी लढू व जिंकू. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विचार आज भारतात प्रत्येक घरा-घरात पोहचले आहे. त्यांचे दिल्ली व पंजाबच्या सरकार मधील कामे आज देश भरात लोकांच्या मनात रुजले आहे. त्यांनी शिक्षणावर केलेले कामे, 200 युनिट वीज बिल माफ, 20 हजार लिटर पाणी फ्री, महिलांना बस टीकीट फ्री, एस सी, एस टी व ओबीसी यांना शिषवृत्ती, शेतकऱ्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई व इतर अनेक कामे आज जनतेला दिसले आहे. आता जनतेला प्रश्न आले आहे की, जर हे सगळे कामे दिल्ली व पंजाब मधे होऊ शकतात तर आपल्या महाराष्ट्र मधे का नाही ? हाच विश्वास घेऊन मला वरिष्ठांनी आदेश दिला तर आमदारकी लढू आणि जिंकून दाखवू. असा विश्वास आम आदमी पक्षाचे चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here