Home चंद्रपूर गंभीर :- चंद्रपुर मनपामध्ये राष्ट्रीय शुष्द हवा कार्यकम (NCAP) योजनेत लाखोंचा वृक्षारोपण...

गंभीर :- चंद्रपुर मनपामध्ये राष्ट्रीय शुष्द हवा कार्यकम (NCAP) योजनेत लाखोंचा वृक्षारोपण घोटाळा

उपअभियंता रविंद्र हजारे यांच्या मर्जीतील कंत्राटदार मे. काहाळे ट्रेडींगचे बोगस कामे चव्हाट्यावर.

उपअभियंता रविंद्र हजारे यांच्या पॉलिटेकनिक डिप्लोमाच्या चौकशीची मागणी?

चंद्रपूर :-

चंद्रपूर महानगर पालिका व्दारा राष्ट्रीय शुष्द हवा कार्यकम (NCAP) योजने अंतर्गत सन जुलै २०२३ मध्ये एक निविदा काढलेली होती. त्यात शहर सौदर्याकरण अंतर्गत सुशोभित करण्यासाठी प्रियदर्शनी चौक ते राहुन धाबा (लखमापुर) नागपुर रोड पर्यंत रस्त्याचे दुतर्फा भागात सेल्फ वॉटरिंग ट्री गार्ड सह वृक्ष लागवड करणे होते. हे काम उपअभियंता रविंद्र हजारे यांच्या मर्जीतील कंत्राटदार मे. काहाळे ट्रेडींग कंत्राटदाराने कामे करून वृक्ष लागवड हि केली आहेत. परंतु अल्पवधीतच अवघ्या ६ महिण्यात झाडाची नासधुस होवुन त्यातील नव्वद टक्के झाडे मेलेली आहेत. वृक्ष लागपड करतांना ट्री गार्ड सह लावले जावे असे निविदेत नमूद असतांना कंत्राटदाराने प्लॉस्टीक पाईप लावुन थातुर माथुर कामे केलेली आहेत, दोन झाडातील अंतर सुध्दा ठराविक नसुन महानगर पालिकेने ठरवुन दिलेल्या अटी व शर्तीचा कंत्राटदाराने फज्जा उडवुन निकृष्ठ दर्जाचे काम केलेले आहे.

सदर हे काम ३४,२९,३७०/- रूपयाचे असुन त्यातुन उपअभियंता रविंन्द्र हजारे आणि कंत्राटदार यांनी ५० टक्के कमाई केलेली आहे सदर काम करून शहर सुंदर व सुशोभित करण्यासाठी होते परंतु उपअभियंता हजारे आणि कंत्राटदार काहाळे यांनी मोठा भ्रष्टाचार करून स्वतःचे खिसे गरम केले असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

उपअभियंता रविंद्र हजारे यांच्या पॉलिटेकनिक डिप्लोमा बोगस?

उपअभियंता रविंद्र हजारे यांचा मर्जीतील कंत्राटदार काहाळे यांच्यासोबत पार्टनरशिप करून लाखों रुपयांचा वृक्षारोपण घोटाळा झाल्याचे आता उघड झाले असतानाच आता उपअभियंता रविंद्र हजारे यांचा पॉलिटेकनिक डिप्लोमा बोगस असल्याचे बोलल्या जात आहे, स्वर्गीय माजी नगराध्यक्ष धन्नू महाराज यांच्या कार्यकाळात शिफारशीने पॉलिटेकनिक डिप्लोमा बोगस जोडून सरळ इंजिनिअर ची पोस्ट मिळविणारे उपअभियंता रविंद्र हजारे यांचा त्या डिप्लोमा खरा की खोटा हा विषय आता उच्चस्तरीय चौकशीतून बाहेर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here