Home भद्रावती गंभीर :- भद्रावती शहरातील उदय लॉज वर मागच्या दारातून प्रेमी युगलांची एंट्री?

गंभीर :- भद्रावती शहरातील उदय लॉज वर मागच्या दारातून प्रेमी युगलांची एंट्री?

संचालक राजू कारेमोरे कडून वार्डातील नागरिकांना होतोय त्रास व संताप ते करणार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार?

शहरातील उदय लॉज हा अल्पवयीन मुलं मुली, युवक युवती यांच्या रासलीला व प्रणयक्रीडा याचा अड्डा बनला असून या लॉज समोर चंद्रपूर नागपूर महामार्ग व दुकानाची लाईन असल्याने या लॉज मध्ये येणारे ग्राहक हें मागच्या दाराने येत आहे, जणू काही या लॉज मध्ये काहीच काळपांढर होतं नाही अशा तोऱ्यात या भद्रावती येथील उदय लॉजचे संचालक वावरत असून याला कुणाचे संरक्षण आहे हे येत्या काही दिवसातच कळणार असून या लॉजवर चालणारे समाज विघातक धंदे बंद करण्यात यावे यासाठी या वार्डातील नागरिक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

चंद्रपूर नागपूर महामार्गालगत असलेल्या उदय लॉज चालविणारा सावनेर येथील राजू कारेमोरे यांनी लॉज वर मागच्या बाजूने मार्ग काढून देहव्यापार व शाळेकरी मुलं मुली व युवक युवती यांना रासलीला व शारीरिक सुखं भोगण्याचाअड्डा बनवला असून शाळेकरी मुली शाळेच्या ड्रेसवर येथे येतात, त्या माध्यमातून लॉज मालकाला मोठं भाडं मिळतं पण येणारी युवा पिढी यांमुळं बर्बाद होतं आहे, या लॉज वर येणाऱ्या प्रेमी युगल जोडपे यांच्यापासून वार्डातील नागरिकांना मोठा त्रास होतं असून सकाळ पासून तर रात्री उशिरापर्यंत येथे वर्दळ राहत असतें, त्यामुळे या परिसरातील सामाजिक आरोग्य धोक्यात येत असल्याने पोलीस प्रशासनाने उदय लॉज वर मागच्या दाराने होतं असलेला देहव्यापार व प्रेमी युगल यांच्या रासलीला बंद कराव्या अन्यथा या परिसरातील नागरिकांकडून मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here