Home अपघात कारची टिप्परला मागुन धडक एक ठार ,दोन गंभीर ,

कारची टिप्परला मागुन धडक एक ठार ,दोन गंभीर ,

  • ज्ञकारची टिप्परला मागुन धडक एक ठार ,दोन गंभीर ,

    वरोरा:-प्रतिनीधी धनराज मा बाटबरवे

    चंद्रपूर नागपूर राज्य मार्गावरून जात असलेल्या एका मालवाहू टिप्परला काॅलीस चार चाकी वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने काॅलीसमधील एक जण ठार तर दोघे ‌जखमी झाले.ही घटना येथून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रपूर नागपूर महामार्गावरील ते टेमुर्डा गावाजवळ शुक्रवार 28 जून रोजी रोजी तीन वाजताच्या सुमारास घडली.चंद्रपूर येथील पाहणी दौरा आटोपून रेल्वेचे अधिकारी कारने नागपूरला परतत असताना हा अपघात झाला.एम एच 31 ए जी 9351 क्रमांकाच्या काॅलीस कारने रेल्वेचे दोन अधीकारी नागपूरला जात होते.याचवेळी जी जे 12 बी वाय7244 क्रमांकाचा टिप्परही नागपूरच्या दिशेने जात होता. टिप्परच्या मागून जात असलेल्या कारने समोर जात असलेल्या मालवाहू टिप्पर ला जोरदार धडक दिली.यावेळी काॅलेजमध्ये बसलेले सुरेंद्रसींग कर्तारसींग चव्हाण वय 50 राहणार नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला तर बबलू डोंगर वय 50 व एस व्यंकटेश राव 50 राहणार नागपूर हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले. अपघातानंतर जखमींना येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले आहे .दक्षिण पुर्व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना शुक्रवारी चांदा फोर्ट येथे पाहणी दौरा आटपून सदर रेल्वेचे अधिकारी नागपूरकडे परतत होते .अपघातात मृत्यु पावलेले रेल्वेचे अधिकारी सुरेंद्र सिंग हे नागपूर येथील नागपूरच्या मोतीबाग पीआय एस मध्ये कार्यरत होते. तर जखमी झालेले व्यंकटराव बाबू हे कारचे चालक तर बबलू डोंगर हे नागपूर रेल्वेचे अधिकारी आहेत .जखमींना नागपूरच्या किंग्जचे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे .वरोरा पोलीस घटनेची चौकशी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here