Home गंभीर संतापजनक :- लोकसभेत डिपॉझिट जप्त झालेले वसंत मोरे यांनी शिवसेनेत मारली पलटी

संतापजनक :- लोकसभेत डिपॉझिट जप्त झालेले वसंत मोरे यांनी शिवसेनेत मारली पलटी

वंचितचा पहिला खासदार होण्याचे दुर्मिळ स्वप्ने पाहणाऱ्या वसंत मोरे यांचे कार्यालय फोडण्याची वंचित कार्यकर्ते यांची धमकी.

वसंत मोरे यांनी मनसे सोडून स्वतःची राजकीय आत्महत्या केली का? एक विश्लेषण.

पुणे न्यूज :-

कोणत्याही परिस्थितीत पुणे लोकसभा निवडणूक लढविणारच व पुणेचा खासदार होणारच हे दिवसाढवळ्या स्वप्न बघणारे मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करतं वंचित च्या प्रकाश आंबेडकरांना भेटून लोकसभा उमेदवारी मागितली पण त्यांचं लोकसभेत डिपॉझिट जप्त होऊन त्यांची हवा गुल झाली, आता वंचित चं काही खरं नाही म्हणून तिथून सुद्धा पलटी मारून शिवसेनेच्या उबाठा गटामध्ये प्रवेश करणार असल्याने वंचित च्या कार्यकर्त्यांनी वसंत मोरे यांना इशारा दिला आहे, खरं तर राजकारणात ज्यांचा स्वतःवर विश्वास नसतो त्याला अनेक पक्ष शोधावे लागतात जर वसंत मोरे यांनी थोडा संयम पाळला असता तर त्यांच्यावर वंचित मध्ये नामुस्की आली नसती किंव्हा उबाटा मध्ये जाऊन स्वतःची फजिती करायची वेळ आली नसती, कारण शिवसेनेत अगोदरच खडकवासला व हडपसर विधानसभा मतदार संघात अनेक दावेदार असताना डिपॉझिट जप्त झालेल्या बाहेरच्या व्यक्तीला शिवसेना स्थानिक नेते खपवून घेणार का? हा खरा प्रश्न असून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नावाचे वलंय असल्याने पुणेकर त्यांना समजून घेत होते पण ते स्वतःला हिरो समजायला लागले आणि लोकसभेत डिपॉझिट जप्त करून झिरो होऊन बसले त्यामुळे त्यांनी एक प्रकारे मनसे सोडून राजकीय आत्महत्या केली असल्याचे बोलल्या जातं आहे.

वसंत मोरे यांनी खासदार होण्याच्या नादात व स्वतःला पक्षापेक्षा मोठा समजून स्वतःच्या स्वार्थासाठी मनसे सोडली खरी पण मनसे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त करून त्यांची लायकी दाखवली हे वास्तव कुणी नाकारू शकत नाही, कारण पुणेचे मनसे पदाधिकारी हे भाजपच्या उमेदवारासाठी काम करतं होते आणि मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा पुणे येथे सभा घेऊन भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मतदान देण्याचे आवाहन केले होते त्या मोहोळ यांना 5,84,728 मते मिळाली तर कांग्रेस चे रवींद्र धंगेकर यांना 4,61,690 मते मिळाली आणि सर्वात अगोदर खासदार मीच होणार अशा फुशारक्या मारणाऱ्या वसंत मोरे यांना केवळ 32,012 मते मिळाली अर्थात डिपॉझिट जप्त झालं. यावरून वसंत मोरे यांनी खासदार होण्याचे जे दावे केले होते ते पुणेच्या जनतेने फोल ठरवले आणि ते दोष ज्या वंचीत ने उमेदवारी दिली त्या वंचितला देतात हेच खरं दुर्भाग्य आहे, जिथे जन्म झाला जिथे सांभाळ झाला तिथेचे फना काढायचा असा स्वभाव वसंत मोरेचा आहे आणि त्यामुळेचं पुणेकरांनी यांचा गेम केला असे दिसताहेत.

मनसे सोडल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. शरद पवार यांची त्यांनी भेटही घेतली होती. मात्र, ही जागा कॉंग्रेसकडे गेल्याने येथून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती. पण, त्यांना निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. आता परत त्यांना विधानसभा निवडणुकीत आमदार होण्याचे डोहाळे लागले असल्याने व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पाणीपत झाल्याने विधानसभा निवडणुकीत पुन्हा डिपॉझिट जप्त होणार या भीतीने त्यांनी शिवसेना उबाटा गटात प्रवेश करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली पण ज्याचं लोकसभेत डिपॉझिट जप्त झालं त्याला विधानसभा निवडणुकीत खरंच उबाटा कडून उमेदवारी मिळणार का? हा खरंच मोठा प्रश्न आहे,

वसंत मोरे यांची राजकीय आत्महत्या?

वसंत मोरे हे राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन कुठं जमतंय का? या प्रयत्नात अनेकांना भेटले, पण सरते शेवटी निर्यात केलेले उमेदवार उभे करणाऱ्या वंचित ने त्यांना उमेदवारी दिली पण ते स्वतःच डिपॉझिट वाचवू शकले नाही, त्यामुळे राजकीय भविष्य अंधारात दिसतं असल्याने त्यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची घोषणा केली. ठाकरे गटाकडून ते पुणे मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. मात्र, यामुळेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्यावर भारी संतापले असून पुण्यातील हडपसर येथील वंचितच्या सरोदे नावाच्या कार्यकर्त्याने वसंत मोरे यांना जाहीर इशारा दिला आहे. सरोदे यांनी पुण्याच्या मोरे बागेत असलेले वसंत मोरे यांचे कार्यालय फोडण्याचा जाहीर इशारा दिला आहे. वंचितमुळे लोकसभा निवडणूक लढविली आणि पराभूत झाल्यानंतर पक्ष सोडल्यामुळे हा कार्यकर्ता संतापला आहे. सरोदे याच्या या जाहीर इशाऱ्यानंतर पोलिसांनी वसंत मोरे यांच्या कार्यालयाजवळ बंदोबस्त वाढविला आहे.दरम्यान वसंत मोरे यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा उमेदवारी मिळणार की नाही याबद्दल संशय व्यक्त होतं असल्याने “तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती धुपाटण आलं,” अशी गत वसंत मोरे यांची झाली असल्याने मनसे सोडल्याने वसंत मोरे यांनी स्वतःची राजकीय आत्महत्या करून घेतली असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मनसे सोडून गेलेल्यांची काय अवस्था झाली?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राहून प्रसिद्धी मिळविणारे कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी झाले की नंतर ते स्वतःला हिरो समजायला लागतात आणि ते हे विसरतात की आपल्याला जी ओळख मिळाली ती मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्या सह्याद्रीच्या उंचीच्या व्यक्तीमुळे मिळाली, आणि मग ते आपल्या राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जातात, पण मनसे सोडून गेलेले नितीन नांदगावकर असेल, पुणेच्या रुपाली ठोंबरे असेल किंव्हा शिशिर शिंदे असेल त्यांची आजची स्थिती बघितली तर त्याचं राजकीय आयुष्य संपल्यात जमा आहे. मग मनसे सोडून जाणारे वसंत मोरे यांचं काय होईल? तेचं होणार जे बाकीच्यांचं झालं आहे, त्यामुळे मनसे पक्षात जों राहील त्याला संयम पाळावा लागेल हे निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here