Home Breaking News देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतीपथावर ठेवणारा अर्थ संकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते...

देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतीपथावर ठेवणारा अर्थ संकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

गरीब, शेतकरी, महिला व युवक यांच्यासाठी अर्थसंकल्पातून विशेष विकास योजना

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सातव्या अर्थसंकल्पातून विकसित भारताकडे होणाऱ्या वाटचालीचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले स्वागत

चंद्रपूर  :-  मोदी सरकारने त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज (दि.२३) ला सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सातवा अर्थसंकल्प आहे. नवा अर्थसंकल्प पीएम मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रावर आधारित आहे. या अर्थसंकल्पाचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी स्वागत केले आहे.

जगात अनेक देशांची अर्थव्यवस्था अस्थिर असताना भारत देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतिशील ठेवण्याचा आणि विकसित भारताकडे नेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने या अर्थसंकल्पातून केला आहे. सोबतच गरीब, शेतकरी, महिला व युवक यांच्या विकासासाठी व सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्पातून विशेष लक्ष दिले आहे.

या अर्थसंकल्पात देशाची आर्थिक स्थिती प्रगतीपथावर व स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे व सोबतच विकसित भारताकडे वाटचाल होत असल्याचे या अर्थ संकल्पातून दिसून येते. गरीब, शेतकरी, महिला व तरुणासाठी हा अर्थसंकल्प आहे, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त MSP देण्याचा प्रयत्न आहे, कृषी साठी १ लाख ५२ हजार कोटींची तरतूद,

शेती व शेतकऱ्यांसाठी भरीव योजना, नैसर्गिक शेती वाढविण्यावर भर, शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार, कर प्रणालीत नविन बदल करुन सामान्य व मध्यम करदात्यांना दिलासा दिला आहे. ३० लाख तरुणांना रोजगार देणार, एक कोटी तरुणांसाठी इंटर्नशिप योजना, शिक्षण, रोजगार, कौशल्य विकासावर भर यासाठी भरीव तरतूद, गरीब व मध्यम वर्गासाठी घरांची तरतूद, महिला व रोजगार सक्षमीकरणासाठी विशेष तरतूद, आदी घोषणा सामान्य जनतेसाठी आशादायी आहेत.

याप्रकारे हा अर्थसंकल्प सर्व क्षेत्रातील जनतेची आर्थिक स्थिती प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प असल्याचे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here