Home Breaking News विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे : ज्योती मोरे

विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे : ज्योती मोरे

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, लोणारा (पा), निबाळा, चालबर्डी, चपराळा, आदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये बुक व साहित्य वाटप

चंद्रपूर  :-  दिनांक २५/०७/२०२४, विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे. मुलांच्या बुध्दितमत्तेला योग्य दिशा द्यायची असेल तर त्याची सुरवात त्यांच्या लहानपणापासूनच करायला हवी असे घोडपेठ ग्रामपंचायतीचे सदस्य तथा भद्रावतीच्या काँग्रेसच्या महिला तालुका उपाध्यक्षा ज्योती मोरे यांनी म्हटले.

भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, लोणारा (पा), निबाळा, चालबर्डी, चपराळा, आदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये बुक व साहित्य वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे माजी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती, काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात काँगेसचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते अशोक येरगुडे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीप देवगडे, ग्रामपंचायतीचे गटनेते ईश्वर निखाडे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती मोरे, बल्लारपूर काँग्रेसच्या महिला तालुका तथा सामाजिक कायकर्त्या नाजुका आलाम, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा उरकुडे, शिक्षिका वैशाली वडेट्टीवार, शिक्षिका नेत्रा रघाताटे, भावराव बनकर,

मदन शेरकी, सुधाकर मोरे, निबाळा येथील मुख्याध्यापिका संगीत धाकते , शिक्षिका पद्मा रंगारी, चालबर्डी येथील मुख्याध्यापक् अनिल मातनकर, शिक्षिका संगीता, खन्ना, शिक्षक प्रवीण ताजने, प्रवीण थेरकर, राजेश घोडमारे यांचे उपस्थित भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, लोणारा (पा), निबाळा, चालबर्डी, चपराळा, आदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये बुक वाटप व साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी घोडपेठ, लोणारा (पा), निबाळा, चालबर्डी, चपराळा, आदी येथील शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कि, दिनेश चोखारे याचे हे कार्य अभिमानास्पद असून आज आपल्याला सामाजिक कार्यासह सर्व क्षेत्रात प्रगती करावीच लागेल. जोपर्यंत आपण ध्येय ठेऊन काम करत नाही, तोपर्यंत आपण काय करतो याला महत्त्व नाही.

म्हणून समाजात वावरताना कोणता तरी उद्देश समोर ठेऊनच ध्येय प्राप्त करावे लागेलच. विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे. मुलांच्या बुध्दितमत्तेला योग्य दिशा द्यायची असेल तर त्याची सुरवात त्यांच्या लहानपणापासूनच करायला हवी. आपण त्यांच्यावर योग्य वयात संस्कार दिले तर त्यांना गोष्टींची जाणीव होईल.वरील सर्व शाळांमध्ये शाळांना पुस्तके आणि शालेय साहित्याचे वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here