Home चंद्रपूर खळबळजनक :- चंद्रपूरच्या शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखाच्या घरात काडतुसांचा साठा.

खळबळजनक :- चंद्रपूरच्या शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखाच्या घरात काडतुसांचा साठा.

जिल्ह्यात अनेक गोळीबार व हत्त्याकांड यामध्ये वापरलेल्या बंदूका बिहार मधून? चर्चेला उधान. एटीएस द्वारे चौकशी होण्याची शक्यता, 

पुन्हा मोठं रॉकेट मिळण्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे संकेत, अनेक गुंड अंडरग्राउंड मोठे माशे गळाला लागण्याची शक्यता.

चंद्रपूर :-

जिल्ह्यात सन 2014 पासून राजकीय गुंडगिरी सुरु झाल्यानंतर अनेक गुंडाना राजकीय संरक्षण मिळाल्याने जिल्ह्यात गोळीबार व हत्त्याचे प्रमाण वाढले आहे, त्यातच आता युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरी काल पोलीस पथकाने कारवाई केली असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे, दरम्यान 40 काडतुसे चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागातील घरात सापडली असून 4 तास पोलिसांनी शोध अभियान राबवली होतं.

चंद्रपूर जिल्ह्यातील गेले काही दिवस गोळीबारांच्या घटनात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली होती दरम्यान युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याच्या घरी 7.65 mm ची एकूण 40 काडतुसे सापडल्यामुळं पोलीस देखील चक्रावले आहेत. यासाठी चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागातील सहारे यांच्या घरात 4 तास शोध अभियान राबवले. चंद्रपूर जिल्ह्यात गेले काही दिवस गोळीबारांच्या घटनात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अग्निशस्त्र व हत्यार विरोधी विशेष अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत सहारे यांना शस्त्रे विकण्यासाठी काही युवक येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत सहारे याच्या घरावर धाड घातली. धाडीत 40 काडतुसांसह एक तलवार, 1 मक्झिन आणि बेसबॉल बॅटसह, वाघनखे देखील जप्त करण्यात आली आहेत. सहारे यांच्यासह चंद्रपूर शहराच्या बाबूपेठ भागातील रहिवासी असलेल्या निलेश पराते आणि अमोल कोलतवार नामक 2 तरुणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

विक्रांत सहारे व कुटुंबीयांची चौकशी सुरु?

विक्रांत सहारे यांची वैवाहिक पार्श्वभूमी बघता त्यांच्या पत्नी ह्या बंगाली असल्याची माहिती असून त्यांच्या नावाने असलेले स्वस्त धान्य दुकान ते चालवीत होते व आता त्यांचे भाऊ ते दुकान चालवीत असल्याचे बोलल्या जात आहे, दरम्यान पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. स्वतः पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची माहिती घेतली. एवढ्या मोठ्या संख्येत काडतुसे सापडल्यावर पोलिसांना ही काडतुसे वापरण्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रे कुठे आहेत याचा शोध घेण्यात येत आहे.

काढतुसाचे प्रकरण (एंटी टेररिस्ट स्क्वाड) एटीएस कडे जाणार?

चंद्रपूरच्या शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखाच्या घरात काडतुसांचा साठा सापडला आहे त्यात प्रमुख सूत्रधार हा बिहार मध्ये असल्याची चर्चा असून अंतराराज्य टोळीवर अंकुश लावण्यासाठी ही चौकशी एटीएस कडे जाण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here