मुख्य आरोपी नागपुरातील समीर शेख यासह इतर आरोपी स्थानिक गुन्हे शाखेला सरेंडर .
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात पुन्हा गोळीबारचा थरार समोर आलाअसून बिनबा गेटजवळील हॉटेल शाही दरबारमध्ये घुघुस येथील कुख्यात गुंड हाजी अली जेवण करत असतांना त्यांचेवर सात हल्लेखोरांनी हल्ला केला व गोळीबार करून चाकूने सपासप वार सुद्धा केले त्यामुळे तो जागीच ठार झाला, या दरम्यान मुख्य आरोपी नागपूर येथील समीर शेख यासह इतर आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखेत सरेंडर केले असून शहरात वाढत असलेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घुग्गुस येथील हाजी हा कोळसा व्यवसायात कोळशाच्या व्यापारात सहभागी असल्याचे बोलल्या जातं आहे दरम्यान अज्ञात गुन्हेगार नुकताच तुरुंगातून सुटला होता. त्याची हत्या जुन्या शत्रुत्वाचा परिणाम असल्याचे मानले जाते आणि यामुळे शहरातील गुन्हेगारी अंडरवर्ल्डमधील एका कुख्यात अध्यायाचा अंत झाला आहे माहिती असून या स्पर्धेत नागपूर येथील व्यापाऱ्यांची सुपारी घेऊन तर ही हत्त्या केली नसावी अशी शंका निर्माण होत आहे, दरम्यान जुना वैमनशातून ही हत्त्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती असून पोलीस तपासात मुख्य आरोपी समीर यांचेकडून काय खुलासे होणार याकडे पोलीस प्रशासनासह अनेकांचे लक्ष लागले आहे.