स्वातंत्र्य दिनाची प्रेरणा घेत देशसेवेच्या भावनेने प्रेरित व्हा – आ. किशोर जोरगेवार
स्वातंत्र्य दिना निमित्त बिरसा मुंडा चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रमांचे आयोजन
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-आपल्या स्वातंत्र्याच्या मागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे अथक परिश्रम, त्याग, बलिदान आणि देशभक्तीची भावना आहे. अनेक नायकांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले. त्यांच्या या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा आनंद अनुभवत आहोत. आजच्या या दिनाची प्रेरणा घेत देशसेवेच्या भावनेने प्रेरित व्हा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
स्वातंत्र दिना निमित्त आदिवासी समाजाच्या वतीने बिरसा मुंडा चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेयावेळी प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमांना अशोक तुमराम यांच्या सह समाज बांधवांचीउपस्थिती होती.
स्वातंत्र्य दिन हा आपल्यासाठी केवळ एक दिवस साजरा करण्याचा क्षण नाही, तर तो आपल्या कर्तव्यांची आठवण करून देणारा आहे. आजही आपल्यासमोर असलेल्या शिक्षणाचा अभाव, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षण. या सर्व आव्हानांचा सामना करून आपल्या देशाला अधिक सशक्त, समृद्ध आणि स्वावलंबी बनविणे हे आपले कर्तव्य आहे. आपण आपल्या देशासाठी काय करीत आहोत, या विचाराने प्रत्येक भारतीयाने प्रेरित व्हावे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्या विचारात, आचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे,देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण होताच उपस्थितांनी तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगाण गाईले.