अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- दि.19/08/2024,अंबुजा फाउंडेशन उप्परवाही उत्तम कापूस ,प्रकल्प जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सूमठाणा व राजे शिवबा ग्राम संघ( उमेद) यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळेतील मुलांना क्लायमेट चेंज, जैवविविधता व वृक्षाचे महत्व समजावण्यासाठी त्यांच्याकडून जंगल सफारी करून घेण्यात आली.
तसेच राखीच्या पर्वावर त्यांच्याकडून वृक्षारोपण करून वृक्षांना राखी बांधून झाडांचे महत्त्व हे समजवण्यात आले. वन विभाातर्फे डेन्स फॉरेस्टिंग साठी 11000 झाडे या प्रसंगी लावण्यात आले.
यावेळी अंबुजा फाउंडेशनचे प्रक्षेत्र अधिकारी- रजनी खानोरकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक -डॉ.श्री मधुकर कोटनाके सर, शिक्षिका -वैशाली भोयर मॅडम, श्री.मारोती झाडे सर , श्री भाऊराव बोंडे सर, श्री. विनोद मेश्राम सर,वनरक्षक -संदीप तोडासे सर, सीआरपी -समीक्षा सोयाम, ग्राम संघ अध्यक्ष – वंदना येरणे, पूनम चौधरी आदींसह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.