कोळसा चोरी प्रकरण:
सबसिडीचा कोळसा खाजगी कोळसा टालवर आणि तिथून विक्री खुल्या मार्केटमधे? दररोज कोट्यावधीची उलाढाल !
चंद्रपूर :-
सबसिडीचा कोळसा ज्या खाजगी कंपन्यांना सरळ वेकोलि कोळसा खाणीतून मिळत असतो तो कोळसा यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी कोळसा टालवर नेण्यात येऊन तिथून तो कोळसा खुल्या मार्केटमधे जादा भावाने विकल्या जात होता व कोट्यावधी रुपयाची हेराफेरी केल्या जात होती, त्याचा नुकताच दिनांक १७ फेब्रुवारीला भंडाफोड झाल्याने वेकोलि ते खाजगी किंव्हा सरकारी कंपन्या यामधील एजंट असलेले कोळसा दलाल आता पोलिसांच्या तावडीत सापडले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ऐकून ३० कोळसा टाल असून यवतमाळ जिल्ह्यात ऐकून १५ कोळसा टाल आहे, त्यापैकी बहुतांश कोळसा टाल हे बेकायदेशीर आहे, शिवाय या कोळसा टाल शेजारी जे मोठमोठे वे-ब्रिज लावले आहे ते सुद्धा बेकायदेशीर आहे, अर्थात या कोळसा टालवर येणारे कोळशाचे ट्रक सुद्धा बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न होते.त्यामुळे कोळशाच्या या वाहतूक आणि विक्री संदर्भात कोळसा माफियांची संबंधीत कंपन्यांच्या संचालकांसोबत साठगाठ असल्यामुळे शासनाच्या राष्ट्रीय संपत्तीची एक प्रकारे सामूहिक चोरी केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार चंद्रपूर तालुक्यातील नागाडा येथील कोळसा टालवर पकडलेल्या कोळसा ट्रक गाड्यामुळे उघडकीस आला आहे. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कोकाटे व त्यांचे सहाय्यक अधिकारी बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसा चोरीचे गंभीर प्रकरण चौकशीत असून यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कोळसा टाल व त्याला लागून असणाऱ्या वे-ब्रिज संचालकांची सुद्धा कसून पोलिस चौकशी होणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील अनधिकृतपणे चालणारे कोळसा टाल हे पोलिसांच्या राडारवर असल्याचे बोलल्या जात आहे.