यावर्षी, मंडळाने पाण्याची बचत आणि वृक्षारोपणाचे महत्त्व सांगणारा देखावा सादर करण्याची योजना केली आहे. या देखाव्यात विविध भिंतीवरील चित्रे, टाकाऊ वस्तूंमधून बनवलेले कलाकृती, कारंजे, महाकाली मंदिराची प्रतिकृती आणि ई-बाईक देखाव्यांसह पर्यावरणाचे महत्त्व दर्शवले जाईल.
यावर्षी मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे, ज्यामध्ये किल्ला स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, विज्ञान प्रदर्शनी, रांगोळी स्पर्धा, पारंपारिक वेशभूषा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, पथनाट्य, महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचे प्रदर्शन, कबड्डी, लगोरी, किल्ले बनवण्याची स्पर्धा, जुने नाणे प्रदर्शन आणि वृक्षारोपण यांचा समावेश आहे.
सर्व गणेश भक्तांनी दत्त नगर, नागपूर रोड, चंद्रपूर येथे मंडळाच्या सर्व उपक्रमांना आणि देखाव्यांना भेट देऊन समर्थन देण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.