अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर: ‘ब्लू लाईन’ क्षेत्रातील बेकायदेशीर प्लॉट विक्रीवर महापालिकेने 23 बिल्डरांवर एफआयआर दाखल….
चंद्रपूर :- चंद्रपूर शहराच्या सीमेवर असलेल्या राखीव क्षेत्र आणि पूररेषा (ब्लू लाईन) अंतर्गत कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा जमीन खरेदी-विक्रीवर कठोर शासन निर्बंध लागू आहेत. तथापि, या सरकारी सूचनांकडे दुर्लक्ष करून या भागात बेकायदेशीरपणे भूखंडांची विक्री सुरू आहे. यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेने 23 बिल्डर आणि विकासकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
बेकायदा बांधकामांची कारवाई
चंद्रपूरच्या इराई नदीकाठी आरक्षित व पूरग्रस्त भागात होत असलेल्या बेकायदा बांधकामांचा उलगडा करण्यासाठी महापालिकेने मोहीम सुरू केली होती. तथापि, राजकीय हस्तक्षेपामुळे ही मोहीम थांबवण्यात आली. आता, महापालिकेने वडगाव आणि देवई गोविदपूर विभागातील ब्लू लाईन परिसरात सात ठिकाणी बेकायदा ले-आऊट टाकून भूखंडांची विक्री करणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई केली आहे.
ग्राहकांची फसवणूक
वडगाव आणि तुकूम गोविदपूर विभागात बेकायदेशीरपणे भूखंड विकलेल्या 23 बिल्डरांनी ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या बाबतीत महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
वाढवलेली पाळत आणि ड्रोन तंत्रज्ञान
महापालिकेने बेकायदा बांधकामे आणि भूखंड विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. या पथकाचे सदस्य नियमितपणे या भागात भेट देतील आणि आवश्यकतेनुसार ड्रोनच्या सहाय्याने देखील निरीक्षण केले जाईल.
तक्रारीतील बिल्डरांची यादी
तक्रारीत 23 बिल्डर आणि विकासकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
1) राहुल बोटूवार 2) नानाजी इटनकर 3) पुनम इटनकर 4) योगिता रघटाटे 5) राजेंद्र रघटाटे 6) दीपक चौधरी 7) विकास घाटे 8) सरिता घाटे 9) नंदलाल बियाणी 10) मधुकर मानेकर 11) भरत वाघाडे 12) स्वाती तातावार 13) संजय लेखवानी 14) रवी चिमनानी 15) मोहन ठाकरे 16) अतुल रायपुरे 17) बंडू नगरकर 18) रफिक शेख 19) व्यंकटस्वामी पंगा 20) कृष्णा मारवा 21) रामकृष्ण रवा
23) मंजू कश्यप
या कारवाईने चंद्रपूर शहरात खळबळ माजली आहे आणि महापालिकेची कडक कारवाई सुरू आहे