Home गंभीर त्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सेक्युरिटी संचालक यांचा दोष नसल्याचा खुलासा

त्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सेक्युरिटी संचालक यांचा दोष नसल्याचा खुलासा

रात्रीच्या वेळी महाविद्यालयातील लेडीज हॉस्टेल मध्ये जावेद हुसेन यांनी सुरक्षतेच्या दृष्टीने महिला सुरक्षा रक्षक यांना सतर्क केल्याची कबुली.

चंद्रपूर :-

मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात जावेद हुसेन यांचे सेक्युरिटी व इतर कर्मचारी सप्लाय चे काम सुरू आहे, दरम्यान या महाविद्यालयाच्या लेडीज हॉस्टेल मध्ये जावेद हुसेन हे रात्रीला गेले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधी यांच्याकडे आली होती व त्या संबंधाने बातमी प्रकाशित करण्यात आली होती,

मात्र वस्तुस्थिती समोर आल्यानंतर असे कळले की जावेद हुसेन यांना महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक यांनी महाविद्यालयात एका अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात समस्या असल्याने बोलावले होते व तिथे ते गेल्यानंतर लेडीज हॉस्टेल मध्ये कुठलीही सुरक्षेबाबत कमी असू नये याकरिता परिस्थिती पाहणी केली होती असा खुलासा प्रशासन व सुरक्षा रक्षक यांच्याकडून करण्यात आला आहे, त्यामुळे सेक्युरिटी संचालक जावेद हुसेन यांची या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कुठलीही तक्रार नसल्याचे स्पष्ट होतं आहे व या संदर्भात कुठलाही आक्षेप नसल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here