अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- १९ सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेस अनुसरून राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ गुरुवार १९ सप्टेंबर रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. विपीन पालीवाल यांच्या हस्ते जटपुरा गेट येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला वंदन करून करण्यात आला.
News reporter :- अतुल दिघाडे
याप्रसंगी आयुक्त श्री. विपीन पालीवाल यांनी हे अभियान देशपातळीवर राबविल्या जात असल्याचे सांगितले.अभियानात ओला व सुखा कचरा याबाबत जनजागृती करण्यात येणार असुन विविध सार्वजनिक ठिकाणे, बगीचे, उद्याने यांची स्वच्छता केली जाणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणासाठी १ पेड माँ के नाम हे अभियान सुद्धा राबविले जाणार असल्याचे सांगितले.
अभियानातील उपक्रमांतर्गत जटपुरा गेट ते रामाळा तलाव रोड व रामाळा तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली. परिसरात वृक्षारोपण करण्यात येऊन स्वच्छतेला संस्कार बनवुन ते पुढच्या पिढीला देण्याचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी स्वच्छतेची शपथ सुद्धा घेण्यात आली.
रामाळा तलाव स्वच्छ करण्यात योगदान देणाऱ्या वाल्मिकी मच्छूवा सहकारी संस्थेच्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. रामाळा तलाव परिसरात विद्यार्थ्यांद्वारे पोवाडा, पथनाट्य सादर करण्यात येऊन स्वच्छतेवर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली व अचुक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थी तसेच नागरिकांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.