Home चंद्रपूर सिंदेवाही तालुक्यात २७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या...

सिंदेवाही तालुक्यात २७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित – तालुक्यांतील अंतर्गत मार्ग कात टाकणार

सिंदेवाही तालुक्यात २७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित – तालुक्यांतील अंतर्गत मार्ग कात टाकणार

राजेंद्र मेश्राम 

 

विशेष जिल्हा प्रतिनिधी 

चंद्रपूर

ब्रह्मपुरी:-राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रा आमदार विजय वडेट्टीवार यांचा विकासात्मक दृष्टिकोन, मतदार संघातील नागरिकां प्रति असलेली तळमळ, आणि शासन स्तरावर सतत पाठपुरावा करण्याचा दीर्घ अनुभव यामुळे आजवर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात कोट्यावधींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून अत्यंत गरजेची व लोक उपयोगी कामे पूर्णत्वासही आली. सदर क्षेत्राचा ना भूतो न भविष्यती असा विकास साधण्यात विरोधी पक्ष नते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांना तोड नाही. असे असतानाही त्यांनी आपल्या विकास कामांचा झंजावात कायम राखत अर्थसंकल्प – २०२४ व मनरेगा अंतर्गत सिंदेवाही तालुक्यात पुन्हा २७ कोटींची विकास कामे मंजूर करून आणून आज या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा थाटात पार पडला.

आज भूमिपूजन सोहळा पार पडलेल्या विकास कामांमध्ये सिंदेवाही तालुक्यातील अर्थसंकल्पीय योजने अंतर्गत कुकडहेटी ते पांगडी ग्रामा २६ मजबुती करणासह सुधारणा करणे करिता ३ कोटी २० लक्ष, नलेश्वर येथे आदिवासी उपयोजने अंतर्गत मोहाळी ते जामसाळा ग्रामा वर लहान पुल बांधकामा करिता ३ कोटी ५० लक्ष, रामाळा – गडबोरी – वासेरा रस्ता प्रजिमा – ४३ मजबुतीकरण करण्यासाठीं २ कोटी ७५ लक्ष, वासेरा – पिपरहेटी – कोळसा रस्ता ईजिमा – ५८ मजबुतीकरण करण्यासाठीं २कोटी ५०लक्ष, शिवणी येथे मनरेगा अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी २५ लक्ष, देलनवाडी – शिवणी प्रजीमा -४४ वर पुलाचे बांधकाम करीता ३ कोटी, रत्नापुर – खांडला – सरांडी ग्रामा- ५ ला जोडणाऱ्या पुरकेपार पोचमार्ग सुधारणा करिता २ कोटी ५० लक्ष, रत्नापुर ते नाचनभट्टी ग्रामा -४६ रस्त्याची सुधारणा करिता ३ कोटी, नाचनभट्टी येथे मनरेगा अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी २५ लक्ष, नैनपुर (चिमूर रोड) येथे राज्य मार्ग ३२२ ला जोडणाऱ्या चक आलेसुर ग्रामा -६ मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठीं २कोटी ५० लक्ष, नवरगाव येथे मनरेगा अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी २५ लक्ष, अंतरगाव येथे मनरेगा अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी २५ लक्ष, देलनवाडी – चिखलमिनघरी – ते अंतरगाव ग्रामा- ७० चे मजबुतीकरण व डांबरीकरणाकरिता ३ कोटी, देलनवाडी येथे मनरेगा अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी २५ लक्ष अश्या एकुण २७ कोटींच्या विकास कामांचे आज भूमिपूजन पार पडले.
आयोजित भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा कृउबा समीती सभापती रमाकांत लोधे, कृउबा समिती उपसभापती दादाजी चौके, काँग्रेसचे ज्येष्ठ बाबुराव गेडाम, जनकिराम वाघमारे,सिंदेवाही माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, युवक काँग्रेस ता.अध्यक्ष अभिजित मुप्पिडवार, भटक्या जमाती व विमुक्त जाती सेल ता. अध्यक्ष महेश मंडलवार,सचिन सहारे, सरपंच राहूल बोडने, सुशांत बोडने, निक्कु भैसारे , रोशन वारजुरकर, प्रवीण वानखेडे, ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष, ग्राम पातळीवरील सर्व सरपंच, पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here