Home चंद्रपूर संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणीने समाजाला संघटित आणि एकसंध...

संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणीने समाजाला संघटित आणि एकसंध राहण्याची प्रेरणा मिळाली – आ. किशोर जोरगेवार

संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणीने समाजाला संघटित आणि एकसंघ राहण्याची प्रेरणा मिळाली – आ. किशोर जोरगेवार

तेली समाजाच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार, श्री संताजी जगनाडे महाराज समाज भवनाचे भूमिपूजन

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज हे आपल्या समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे विचार आजही आपल्याला आदर्श मार्गदर्शन करतात. त्यांनी समाजाला आत्मनिर्भरतेचे आणि श्रमाच्या महत्त्वाचे धडे दिले. त्यांच्या शिकवणीने समाजाला संघटित आणि एकसंध राहण्याची प्रेरणा मिळाली. आज त्यांच्या भवनासाठी निधी देता आल्याचे समाधान आहे. आपण केलेला सत्कार आयुष्यभर स्मरणात राहील. पुढेही समाजहितासाठी शक्य ती सर्व मदत करण्याचा संकल्प करत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
50 लाख रुपयांतून घुग्घूस येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज समाज भवन तयार केले जाणार आहे. या भवनाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर घुग्घूस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात समस्त तेली समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त प्रा. श्याम धोपटे, प्रकाश देवतडे, अजय वैरागडे, मनिष खनके, प्रा. संयज बेले, अभय घटे, जितेंद्र इटनकर, शैलेश जुमडे, संतोष ढेंगळे, डॉ. दिपक ताटपल्लीवार, अनिल वैरागडे, शालीक खनके, सोनल भटारकर, सुमित बेले, उमेश आष्टनकर, रमेश भुत्ते, चन्ने, प्रमोद वंजारी, संजय किन्नेकर, हेमंत बुटले आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूरसह घुग्घूस येथेही आपण विकासकामांसाठी मोठा निधी दिला आहे. घुग्घूस ग्रामपंचायतीचे रूपांतर आपण नगर परिषदेत केले होते. त्यानंतर येथील विकासकामांना गती मिळाली आहे. येथील ग्रामीण रुग्णालय आणि उड्डाण पूलाचे काम वेगाने सुरू आहे. आणखी मूलभूत सोयीसुविधा पूर्ण करण्याच्या दिशेने आपले सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
तेली समाज बांधवांच्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज भवनासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर येथे निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू होते. आज येथे निधी उपलब्ध करून देता आल्याचा आनंद आहे. सोबतच आपण इतका भव्य सत्कार केला. त्यामुळे जबाबदारी आणखी वाढली असून या भवनासाठी आणखी निधी लागला, तर तोही आपण उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्याही समाजाचा विकास त्याच्या संघटनावर अवलंबून असतो. आपला तेली समाजही एकात्मता आणि सहकार्याच्या जोरावर आपले स्थान मजबूत करत आहे. आज या भवनाच्या माध्यमातून आपल्या समाजाला एकत्र येऊन निर्णय घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, आणि सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी एक स्थळ मिळणार आहे. हा निधी फक्त एक आर्थिक योगदान नाही, तर आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेली साथ असल्याचे ते या प्रसंगी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here