Home चंद्रपूर रुद्रापुर- कवठी मार्गांवर अखेर बससेवा सुरु सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रयत्नांचे फलित

रुद्रापुर- कवठी मार्गांवर अखेर बससेवा सुरु सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रयत्नांचे फलित

रुद्रापुर- कवठी मार्गांवर अखेर बससेवा सुरु

सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रयत्नांचे फलित

गावकऱ्यांनी केले लालपरीचे उत्साहात स्वागत.

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

सावली:-सावली तालुक्यातील रुद्रापुर- कवठी या गावातील वि‌द्यार्थी-वि‌द्यार्थिनी शिक्षण घेण्याकरिता तसेच या परिसरातील नागरिक तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामाप्रसंगी रोज सायकल किंवा पायदळ जाणे येणे करीत असतात. परंतू हा परिसर जंगलव्याप्त असल्याने सावली कवठी मार्गे वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढलेला आहे, दि. 16 जुलै 2024 ला शाळकरी मुली शाळेत जात असताना रानटी डुकराने हल्ला केला या हल्ल्यात कवठी येथील तिन वि‌द्यार्थिनी जखमी झाल्या होत्या.

याआधी बस सेवा संदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेता मा.ना. विजयभाऊ वड्डेटिवार यांनी होकार देत सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती.माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर श्री.दिनेश पाटील चिटणुरवार,सावली तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष मा.प्रभाकरजी वासेकर, ग्रामपंचायत कवठीचे उपसरपंच श्री.राकेश घोटेकर काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने विद्यार्थी व नागरिकाकरिता बस सेवा सुरू करावी ह्या करिता गडचिरोली आगार प्रमुख श्री.फाल्गुन राखडे यांना संबंधित निवेदन दिले होते तसेच वृत्तपत्रात याबद्दल माहिती देण्यात आली होती.

आज सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या सतत पाठपुरावा व प्रयत्नामुळे अखेर कवठी गावात लालपरीचे आगमन झाले व जलोषात लालपरीचे समस्त गावकऱ्यांनी पूजा करीत स्वागत केले. लालपरी ही सावली- रुद्रापूर फाटा- कवठी- पारडी फाटा येथे बसचा थांबा असणार आहे.लालपरी गावात आल्याने नागरिकांना-विदयार्थाना आता वन्यजीवांचा हिसेंला समोरे जाता येणार नाही व प्रवास करणे सोयीचे झाल्याने कवठी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.कांताबाई बोरकुटे,उपसरपंच मा.राकेश घोटेकर तसेच समस्त गावकऱ्यांनी विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब व तालुका काँग्रेस कमिटीचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here