Home चंद्रपूर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आमदार किशोर जोरगेवार यांनी बाबुपेठ उड्डाणपूल वाहतुकीसाठी केला खुला...

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आमदार किशोर जोरगेवार यांनी बाबुपेठ उड्डाणपूल वाहतुकीसाठी केला खुला माता महाकालीचा रथ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पुलावरून नेत वाहतूक सुरु.

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आमदार किशोर जोरगेवार यांनी बाबुपेठ उड्डाणपूल वाहतुकीसाठी केला खुला

माता महाकालीचा रथ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पुलावरून नेत वाहतूक सुरु.

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-आज, गुरुवारी, आमदार किशोर जोरगेवार यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत बाबुपेठ उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला. यावेळी माता महाकालीचा रथ, तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती पुलावरून नेत हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला झाल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
बाबुपेठ रेल्वे रुळावर उड्डाणपूल तयार करण्यात यावा, अशी येथील नागरिकांची फार जुनी मागणी होती. दर पाच मिनिटांनी येथील रेल्वे गेट बंद होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. गेट बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले, तसेच अनेक रुग्ण आणि गर्भवती महिलांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता.
आमदार किशोर जोरगेवार निवडून आल्यापासून या पुलाच्या कामाला गती देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. परिणामी उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली. मात्र, पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात येऊन निधीअभावी रखडले. या उर्वरित कामासाठी 5 कोटीहून अधिक निधीची गरज होती. हा निधी उपलब्ध करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने प्रयत्न केले, आणि त्यांना यश मिळाले. त्यानंतर शहर विकास निधीतून 5 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आणि कामास गती मिळाली. हे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांसह बैठकांचा आणि पाहणीचा सपाटा लावला होता. अखेर, महिन्या भरात हा पुल तयार झाला, परंतु लोकार्पणा अभावी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष होता. त्यानंतर नागरिकांच्या भावनांचा आदर करून आज आमदार किशोर जोरगेवार यांनी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला आहे.
या कार्यक्रमासाठी बाबुपेठवासीयांच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात बाबुपेठकर नागरिक हजारोंच्या संख्येने एकत्र आले होते. सकाळी 11 वाजता माता महाकालीचे रथ, तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा वाहनावर ठेवून पुलावरून नेण्यात आली, आणि हजारो नागरिकांच्या साक्षीने हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावेळी त्यांनी हा अत्यंत आनंददायी क्षण असून, 50 वर्षांची जुनी मागणी पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले. आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असे ते म्हणाले. आता येथून वाहतूक सुरु झाली असून बाबुपेठवासीयांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here