Home चंद्रपूर सावली तालुक्यातील नाभिक बांधवाना सलून किटचे वाटप काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार...

सावली तालुक्यातील नाभिक बांधवाना सलून किटचे वाटप काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांची उपस्थिती

सावली तालुक्यातील नाभिक बांधवाना सलून किटचे वाटप

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांची उपस्थिती

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी 

चंद्रपूर

सावली:-सावली तालुक्यातील मौजा व्याहाड खुर्द येथे काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांचा मुख्य उपस्थितीत दसरा सणाच्या शुभ-पर्वावर नाभिक बांधवाना सलून किटचे वाटप करण्यात आले.ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे एक जागरूक व जनहितकारी कार्यासाठी कटीबद्ध असलेले कणखर नेतृत्व म्हणजे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार हे होय. त्यांच्या कारकीर्दीत संपूर्ण ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ना भूतो न भविष्यती असा विकास साधला गेला असून आजही त्यांच्या विकास कामांचा झंजावात जोमाने सुरू आहे.त्यांनी प्रत्येक समाज घटकाला सोबत घेऊनच ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात विकासाचा मुहूर्तमेढ रोवला आहे.

यावेळी मार्गदर्शनपर बोलताना युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, नाभिक समाजाचा इतिहास संत सेना महाराज, जिवा महाला व वीर शिवाजी काशीद यांची थोर कहाणी सांगते,छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जिवा महाला व शिवा कशािद हे दोघेही बलुतेदार न्हावी घराण्यातील होते. छत्रपती शिवाजी महाराजानी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर अफझलखानाच्या ‘सय्यद बंडा’ नावाच्या रक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाने सय्यद बंडाला मारून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले.न्हावी हे पूर्वी शस्त्रक्रिया करून तुंबड्या लावीत. जावळ काढणे, जखमा साफ करणे, नारू रोगाचे उपचार करणे हीही कामे करतात. बऱ्याच ठिकाणी लग्नघरातील स्वयंपाकाची व्यवस्था लावणे हे काम न्हावी करतात.आज नाभिक समाज भारतीय समाजाचा अविभाज्य घटक बनला आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात इतर समाज घटकाप्रमाणे नाभिक बांधवांचे योगदान खूप मोठे आहे.

सलून किट वितरण सोहळ्यास माजी जि.प.बांधकाम सभापती दिनेश चीटनुरवार काँग्रेस तालुका अध्यक्ष नितीन गोहने, महिला आघाडी अध्यक्ष उषा भोयर,सरपंच संघटना तालुका अध्यक्ष पुरषोत्तम चुदरी ,माजी प.स.सभापती विजय कोरेवार, माजी प.स.सभापती कृष्णा राऊत,माजी युवा तालुका अध्यक्ष आशिष मनबत्तुलवार, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकर, व्याहाड खुर्द येथील सरपंच सुनीता उरकुडे, माजी सरपंच व्याहाड बुज वंदना गुरुनुले यांचे सह विविध गावातील ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष, काँग्रेस पदाधिकारी सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here