Home चंद्रपूर प्रसिद्ध भीमगीत गायिका कळूबाई खरात उद्या चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते...

प्रसिद्ध भीमगीत गायिका कळूबाई खरात उद्या चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विपश्यना केंद्राचे भूमिपूजन, बाबूपेठ येथे भीमगीताचे आयोजन

प्रसिद्ध भीमगीत गायिका कळूबाई खरात उद्या चंद्रपूरात

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विपश्यना केंद्राचे भूमिपूजन, बाबूपेठ येथे भीमगीताचे आयोजन

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-बाबूपेठ येथील आंबेडकर नगर येथे असलेल्या धम्मभूमी महाविहार येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी विपश्यना केंद्रासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे उद्या, रविवारी सायंकाळी सहा वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. या निमित्ताने भव्य बुद्ध-भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सुप्रसिद्ध गायिका कळूबाई खरात आणि प्रसिद्ध गायक राहुल शिंदे हे बुद्ध-भीमगीत गायणार आहेत.

बाबूपेठ येथील आंबेडकर नगर येथे असलेल्या धम्मभूमी महाविहार येथे विपश्यना केंद्र तयार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी विपश्यना केंद्रासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या निधीतून येथे तयार होणार असलेल्या विपश्यना केंद्राच्या कामाचे भूमिपूजन उद्या रविवारी सायंकाळी ६ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्त महाथेरो डॉ. सुमनवंत्तो यांच्या वतीने भव्य बुद्ध-भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवारी या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध भीमगीत गायिका कळूबाई खरात आणि राहुल शिंदे चंद्रपूरात येणार असून, या कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन धम्मभूमी महाविहारच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here