ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा: “उमेदवारी मागे घेण्यास दबाव आणल्यास आत्महत्या करणार”
चंद्रपूर :- अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने भाजप कार्यकर्ता ब्रिजभूषण पाझारे यांनी बंडखोरी केली आहे. एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या भावूक मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, उमेदवारी मागे घेण्याचा विचार त्यांच्यामध्ये नाही. त्यांनी इशारा दिला की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव आल्यास आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची धमकीही दिली.
News reporter :- अतुल दिघाडे
पाझारे यांचे हे पाऊल भाजपच्या किशोर जोरगेवार यांच्यासाठी मोठे आव्हान ठरले आहे, कारण ते जोरगेवारांच्या विरोधात एक नवा राजकीय गतिरोधक म्हणून उभे राहिले आहेत. राजुरा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याविरोधात माजी आमदार अॅड. संजय धोटे आणि सुदर्शन निमकर यांनी बंडखोरी केली आहे. भोंगळे यांच्यासाठी हा संघर्ष अधिकच तीव्र होत आहे.
भाजपमध्ये सुरू असलेल्या या राजकीय घडामोडी चंद्रपूर व राजुरा यांच्यातील संबंध दर्शवतात. पाझारे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, ३ नोव्हेंबरपर्यंत ते कोणता निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पाझारे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा आदर करतात, त्यामुळे त्यांचे विचार बदलू शकतात, असेही बोलले जाते.
राजकीय वर्तुळात चंद्रपूर व राजुरा यांच्यातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे. भाजप या गोंधळातून बाहेर येईल की बंडखोरी अधिक तीव्र होईल, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.