गुंडगिरी करून रेती चा अवैध धंदा करणाऱ्यावर नागरिकांचा संताप.
मूल प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात असणाऱ्या काही राजकारण्यांचे अवैध रेतीचे धंदे असून अनेक रेती माफीया गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन समाजात अराजकता माजवित असल्याचे दिसत आहे, दरम्यान अशा गुंड प्रवृत्तीच्या रेती माफीयांवर पोलिसांकडून त्वरित कारवाई करण्यात यावी व त्यांच्या अवैध रेती व्यवसायावर प्रतिबंध लावावा अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
रेती व्यवसायात सर्वात मोठा रेती माफिया म्हणून मूल तालुक्यातील चिचपल्ली परिसरात एक कुख्यात व्यक्तीचे नाव आहे, ज्यांनी आपल्या रेती व्यवसायातून मिळवलेल्या काळ्या कमाईतून राजकीय पक्षाचे वरदहस्त प्राप्त करून गुंडागर्दी सुरु केली आहे, या रेती तस्करावर यापूर्वी अनेकदा कारवाई झाली होती व त्यामुळे त्याला या धंद्यातून अलिप्त राहावे लागले होते परंतु काही दिवसापासून एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादामुळे त्यांनी रेती व्यवसायात आपले पाय घट्ट रोवले असून त्याचेवर “राजकीय” नेत्याचा असलेला आशीर्वाद आता नागरिकांपासून लपलेला राहिलेला नाही त्यामुळे या रेती तस्करावर पोलीस अधीक्षकांनी मोक्का अंतर्गत कारवाई करून याला तडीपार करावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहे.