ऐतेहासिक बाहुबली मालिकेतील एका व्हिडीओ ने सामाजिक माध्यमावर मचवली धमाल, व्हिडीओ बघाच.
चंद्रपूर :-
अमरेंद्र बाहुबली हा राजा विक्रमदेव आणि अखिला यांचा मुलगा आहे. सोमदेवाच्या काळानंतर विक्रमदेवाला राज्याचा वारसा मिळाला आणि युद्धात त्याचा मृत्यू झाला. बाहुबलीला जन्म देताना त्याची पत्नी मरण पावली त्यामुळे शिवगामीने त्याचे पालनपोषण तिच्या स्वत:च्या मुलासह भल्लालदेव केले. ते थोर राजपुत्र बनण्यासाठी शैक्षणिक आणि लष्करी प्रशिक्षण घेतात आणि बाहुबली आपल्या लोकांची आणि राज्याची सेवा करण्यासाठी आपला जीव देण्यास मागेपुढे पाहत नाही. तो एक धाडसी आणि दयाळू व्यक्ती आहे आणि त्याने एक कुशल योद्धा असल्याचे सिद्ध केले आहे जो लढाऊ शैलीने अनेक शत्रू सैनिकांसोबत एकटा लढू शकतो. दरम्यान खरा बाहुबली कोण? याबद्दलचे चित्रित केलेले मालिकेतील दृष्य आणि त्यात किशोर जोरगेवार आणि ब्रिजभूषण पाझारे यांचे चेहरे लावून जो व्हिडीओ समाज माध्यमावर फिरत आहे, त्या व्हिडीओ वरून येणाऱ्या निवडणुकीत कोण बाहुबली ठरणार याबद्दल जिज्ञासा लागली आहे.
चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत भाजप चे किशोर जोरगेवार आणि भाजप बंडखोर ब्रिजभूषण पाझारे यांच्यात सामाजिक माध्यमावर वर्चस्वाच्या लढाईची मोठी चर्चा आहे, वेळीवेळी पलटी मारणारे आणि जनतेला खोटे आश्वासन देऊन जनतेची फसवणूक करणारे किशोर जोरगेवार यांच्यापेक्षा ब्रिजभूषण पाझारे बरे अशी खुद्द भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात चर्चा आहे, त्यामुळे आता भाजप बंडखोर पाझारे यांचे पारडे जड होतांना दिसत आहे, दरम्यान सामाजिक माध्यमावर चाललेल्या व्हिडीओ वरून चांगलेच वादळ निर्माण होणार असल्याचे
दिसत आहे.