Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूरचे भाजप उमेदवार किशोर जोरगेवार विरोधात जनतेत असंतोष?

धक्कादायक :- चंद्रपूरचे भाजप उमेदवार किशोर जोरगेवार विरोधात जनतेत असंतोष?

200 युनिट फ्री तर सोडा पाच वर्षात वाढलेले वीज बिलावर सुद्धा जोरगेवार गप्प का? मतदारांचा सवाल?

चंद्रपूर :-

” क्या हुवा 200 वीज युनिट फ्री का वादा. ” म्हणत सामाजिक माध्यमावर नेहमीच जनतेच्या निशाण्यावर टिकेचे धनी होणारे आमदार किशोर जोरगेवार विरोधात आता ऐन निवडणूकीच्या रणधुमाळीत जनतेचा मोठा असंतोष बघावंयास मिळतं आहे, जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी शासनाकडे कुठंलाही पाठपुरावा नं करणारे व जनतेचे लक्ष भटकविण्यासाठी महाकाली महोत्सव घेऊन कोट्यावधी रुपयांचा विनाकारण खर्च करणारे जोरगेवार हे खेळाचे आयोजन करण्याचे काम क्रीडा मंडळाचे असतांना सुद्धा स्वतः आमदार पदाचा दुरुपायोग करून विविध खेळाचे आयोजन करतात व शासनाच्या निधीचा अपव्यय करतात त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांना यासाठी निवडून दिले का? असा संतप्त सवाल चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनता करत आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या फालतूपणाचे अनेक किस्से चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला ठाऊक आहे, नेहमी प्रसिद्धीत राहण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम करणारे जोरगेवार 200 युनिट फ्री देण्याच्या नावाखाली ज्या जनतेने 72 हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून दिले त्या जनतेचे वीज बिल प्रती युनिट 3.5 रुपयावरून 11.30 रुपयांपर्यंत गेल्यानंतर सुद्धा चिकार शब्द नं काढणारे किशोर जोरगेवार यांना खरं तर जनतेने वार्डावार्डात अडवून प्रश्न विचारायला हवे होते की काय झालं तुमचं 200 युनिटच आणि बीज बिलात वाढ होत असतांना तुम्ही कुठे होते? पण जनता वेळेवर मिळणाऱ्या पैशाला बळी पडते म्हणून जोरगेवार सारखे पन्नास खोक्यासाठी गोहाटीत विकल्या जाणारे आमदार निवडून येण्याचे दावे करत आहे जे येथील जनतेचे दुर्दैवंच म्हणावे लागेल असे मत येथीप सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहे. दरम्यान जनतेत किशोर जोरगेवार विषयी असलेला असंतोष निवडणुकीत परिणाम करणारा ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here