Home चंद्रपूर पंचनामा :- 40 हजार महिना द्या आणि खुलेआम रेती ची चोरटी वाहतूक...

पंचनामा :- 40 हजार महिना द्या आणि खुलेआम रेती ची चोरटी वाहतूक करा.

नायब तहसीलदार गादेवार यांचे अजब फर्मान, घुग्गुस परिसरातील अवैध रेती वाहतूक जोरात.

चंद्रपूर :-

एकीकडे जिल्हा प्रशासन रेती घाट लिलाव करत नाही तर दुसरीकडे रेती घाटातून अवैध रेती उत्खनन करून रेतीची वाहतूक करण्यासाठी महसूल अधिकारी मूक संमती देऊन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवीत असल्याचा गंभीर प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असून चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस परिसरातील वर्धा नदीवर असलेल्या चिंचोली, घोडे घाट व हलदा घाटातून प्रती ट्रॅक्टर 40 हजार महिना द्या आणि अवैध उत्खनन करून रेती चोरी करा असे जणू फर्मान नायब तहसीलदार गादेवार यांच्याकडून सुटले असल्याने या घुग्गुस परिसरात खुलेआम रेतीची वाहतूक सुरु असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.दरम्यान मनोज सरोज नामक व्यक्ती ट्रॅक्टर मालकाकडून वसुली करत असून आतापर्यंत जवळपास 15 ट्रॅक्टर मालकांनी ही वसुली दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु असून रेतीचे नदी घाट लिलाव झाले नसल्याने रेती चा मोठा तुटवडा पडून बांधकाम बंद पडले आहे, मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांनीचं रेती चोरट्याना प्रती ट्रॅक्टर 40 हजार रुपये महिना घेऊन परवानगी दिली असल्याची चर्चा घुग्गुस परिसरात सुरु आहे, यामध्ये स्थानीय पोलीस स्टेशनं अधिकारी यांचा पण 20 हजार रुपये हप्ता ठरला असल्याची चर्चा असल्याने शासनाचा अवैध रेती चोरीतून कोट्यावधी रुपयांचा महसूल खुद्द नायब तहसीलदार बुडवीत असल्याने नायब तहसीलदार गादेवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here