शेकडो परीक्षार्थी कडून नोकरी करिता लाखों रुपये घेणाऱ्या संचालकांचा मनसे परदाफाश करणार.
चंद्रपूर :–
सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्य शासनाने मागासवर्गीयांना आरक्षण लागू करण्याचे परिपत्रक काढल्यानंतर नंतर सुद्धा चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीत ते आरक्षण लागू केल्या जात नसल्याने व या नोकर भर्तीत शेकडो परीक्षार्थी यांच्याकडून लाखों रुपये घेतल्या जात असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हुशार विद्यार्थ्याना यामुळे संधी मिळतं नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी सहकार आयुक्त, सहकार सचिव यांच्याकडे तक्रार करून या नोकर भरतीवर स्थगिती आणा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना परीक्षेसाठी फार्म भरणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना घेऊन मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा दिला आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एका याचिकेवर सुनावणी दरम्यान बैंक भरती प्रक्रिया सुरु ठेवण्याचा जो आदेश मिळाला त्यामुळे जिल्हा बैंक अध्यक्ष व संचालकांना जो आंनद झाला आहे तो मनसेच्या आंदोलनाने दीर्घकाळ टिकणार नसल्याचे संकेत मिळतं आहे.
मनसेतर्फे सहकार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रभर आरक्षणाच्या नावावर मागील अनेक वर्षांपासून विशेषता 3 वर्षांपासून उपोषणे, मुक मोर्चे, काळ्या फिती लावून धिक्कार कॉर्नर सभा घेतल्या जात आहे. अखिल भारती ओबीसी महासंघ, विदर्भ बहुजातीय आरक्षण समिती, अनुसूचित जाती जमाती महासंघ, दलित पॅन्थर संघटना, आदिवासी संघटना, विमुक्त जाती साठी असणाऱ्या अखिल भारतीय बंजारा संघटन समित्या, कोळी, हलबा, धनगर, धनगळ, मराठा महासंघ इत्यादी आरक्षणासाठी 100 % मध्ये हिस्सा मागत आहे, दरम्यान सुप्रीम कोर्टानी स्वामीनाथन समिती अहवालातील स्वायता मुद्द्यावर आर्थिक सक्षमतेसाठी व विश्वसनियता टिकून राहण्यासाठी सहकारी संस्था सहकारी बैका शासनाच्या अनुदानाचा लाभ घेत असल्याने 2022 चे निकालात दुरुस्त्या सुचविल्या व त्यानुसार राज्य शासनाने दिनांक 25 फेब्रुवारी 2022 ला एक परिपत्रक काढून जिल्हा बैंकेत आरक्षण लागू केले आहे मग तो आदेश डावलून जर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक अध्यक्ष व संचालक हे लाखों रुपये परीक्षा देणाऱ्या उमेदवाराकडून घेत असतील तर मग सरकार का करत आहे? हा प्रश्न करून राज्य सरकारला जे अधिकार आहे त्याचा वापर करून ही नोकर भरती पारदर्शक करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांनी नोकर भरतीसाठी फॉर्म भरले त्या सर्वाना घेऊन खळkhमनसे स्टाईल आंदोलन केल्या जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
नोकर भरतीसाठी पैसे घेणाऱ्या त्या बैंक कर्मचारी व संचालकांचा होणार परदापाश?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या आजी माजी अध्यक्ष व संचालकांनी बैंकेत होणाऱ्या नोकर भरतीत शिपाई 25 लाख व लिपिक 25 लाख असे दर पत्रक तयार करून शेकडो उमेदवारांकडून पैसे गोळा केले आहे, त्यात बैंक आजी माजी अध्यक्ष व संचालक मंडळ यासह बैंकेचे काही अधिकारी कर्मचारी पण सहभागी आहेत त्यांच्या या पैशाच्या व्यवहाराची सम्पूर्ण माहिती मनसेला प्राप्त झाली आहे व ते कोण आहेत त्यांची माहिती लवकरच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर व ईडी कडे पुराव्यासह तक्रार होणार असल्याने या नोकर भरतीमध्ये मागासवर्गीय एससी एसटी व ओबीसी च्या विद्यार्थ्यांना आरक्षण का दिल्या गेले नाही याची पोलखोल होणार आहे.