मागासवर्गीयांचे आरक्षण डावलून व चुकीच्या एजन्सी मार्फत परीक्षा घेऊन कोट्यावधीचा भ्रष्टाचार होतं असल्याने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने घेतली दखल.
काल नागपूर येथील परीक्षा केंद्रावर पुन्हा घोळ झाल्याने परीक्षार्थी संतापले.
चंद्रपूर :-
संपूर्ण महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हा नोकर भरतीचा विषय व त्या संबंधाने घेतल्या गेलेल्या परीक्षेत झालेला घोळ गाजत असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे तक्रार केली होती त्याची दखल घेत मागासवर्गीय आयोग,भारत सरकारचे उपसचिव सुजीत कुमार यांनी दिनांक 23/12/2025 ला राज्य शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव राज गोपाल देवरा यांना पत्र (क्रमांक NCBC/RU/MH/2024/29) देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहे, त्यामुळे आता कोट्यावधीचा भ्रष्टाचार होतं असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेची नोकर भरती प्रक्रिया रद्द केली जाण्याची शक्यता बळावली आहे,
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत आणि इतर संचालक मिळून 360 पदाच्या भरतीकरिता 25 ते 35 लाख रुपये नोकरी करिता घेतले असल्याचा घोडेबाजार जिल्ह्यात सर्वत्र चर्चीला जात असतांना व त्यासाठी त्यानी चक्क शासनाचा 25 फेब्रुवारी 2022 चा मागासवर्गीयांचे (एससी, एसटी व ओबीसी) आरक्षण संदर्भातील अध्यादेश धूदडकावून खुल्या प्रवर्गात भरती घेण्याचा घाट घातला असतांना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी आक्षेप घेत शासनाच्या सहकार क्षेत्रातील सहकार आयुक्त व सहकार सचिव यांच्याकडे तक्रार देऊन चुकीच्या व नियमबाह्य पद्धतीने जी नोकर भरती घेऊन कोट्यावधी रुपयांचा जो भ्रष्टाचार केल्या जात आहे त्याची त्वरित चौकशी करून नोकर भरतीला स्थगिती देऊन नव्याने पारदर्शक पद्धतीने व मागासवर्गीयांचे आरक्षण आबाधित ठेऊन नोकर भरती घ्यावी अशी मागणी केली होती, मात्र बैंक अध्यक्ष व संचालक यांनी अगोदरचं कित्तेक उमेदवारांकडून 25 ते 35 लाख रुपये नोकरी लावून देण्यासाठी घेतले असल्याने “मरता क्या नही करता” या युक्ती प्रमाणे भरती रद्द झाली तर आपण बर्बाद होऊ त्यापेक्षा मुजोरी करून भरती घायचीच ही खुणगाठ बांधून त्यांनी ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना पास करण्यासाठी बोगस आयटीआय कंपनी द्वारे परीक्षेत वेगळी अरेंजमेंट करून डाव साधण्याचा प्रयत्न केला पण पहिल्याच दिवशी पेपर फुटला आणि बैंक अध्यक्ष संतोष रावत आणि परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनीच्या भ्रष्ट कारण्याम्याचे बिंग फुटले आणि सगळीकडे असलेल्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी आंदोलन करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी केली होती दरम्यान ती परीक्षा पुन्हा 29 डिसेंबला घेण्यात आली मात्र पुन्हा परत तोच घोळ या परीक्षेत नागपूर च्या अनेक परीक्षा केंद्रात झाल्याने आता ह्या परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनी व बैंक अध्यक्ष यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होतं आहे.
राजू कुकडे यांचे आवाहन
बैंकेची शिपाई पदासाठी जी परीक्षा तांत्रिक बिघाडमुळे रद्द होऊन ती काल 29 डिसेंबर ला झाली मात्र त्यात सुद्धा बिघाड आल्याने ही परीक्षा पुन्हा होण्याची शक्यता आहे, दरम्यान लिपिक पदासाठी होणारी परीक्षा संपन्न झाली असली तरी बैंक भरतीत झालेला घोळ यामुळे शासनानी जर यामध्ये हस्तक्षेप केला आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने योग्य निर्णय घेतला तर चुकीच्या व नियमबाह्य पद्धतीने कोट्यावधीचा भ्रष्टाचार करून घेतली जाणारी ही नोकर भरती प्रक्रिया रद्द होऊ शकते असे चित्र दिसत आहे, त्यामुळे कुणी संचालक व एजंट यांना नोकरी करिता पैसे देऊ नये असे आवाहन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केले आहे.