Home चंद्रपूर पंचनामा :- सिडीसीसी बैंक परीक्षेच्या प्रश्न आणि उत्तर पत्रिकेत मोठा घोळ.

पंचनामा :- सिडीसीसी बैंक परीक्षेच्या प्रश्न आणि उत्तर पत्रिकेत मोठा घोळ.

एका व्हिडीओ ने सर्व परीक्षार्थीचे उघडले डोळे, परीक्षार्थिनी भरती प्रक्रिया रद्द करण्याची केली मागणी.

ज्या आमदारांनी विधानसभा सभागृहात आवाज उचलला ते आता गप्प कां? जनतेचा सवाल

चंद्रपूर :-

राज्यात चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेचा नोकर भरती घोटाळा गाजत असतांना व बैंक मुख्यालयासमोर आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे आंदोलन सुरु असतांना आता जेंव्हा निकाल लागण्याची वेळ आली तेंव्हा पुन्हा ऑनलाईन उत्तर पत्रिकेच्या बदलत्या गुणांची स्थिती एका व्हिडीओ द्वारे समोर आल्यानंतर आयटीआय कंपनी द्वारे घेतल्या गेलेली ही सिडीसीसी बैंकेची परीक्षा पुन्हा वादात सापडली आहे, दरम्यान ज्यांनी परीक्षा दिली त्या परीक्षार्थिनी आपले अनुभव ह्या व्हिडीओच्या कॉमेंट बॉक्स असे असे व्यक्त केले आहे की त्यावरून आयटीआय कंपनी आणि सिडीसीसी बैंक संचालक यांच्या भ्रष्ट कारभाराचा जणू त्यांनी पंचनामा केला आहे. एका परीक्षार्थीच्या मते परीक्षेत विचारले गेलेले 5 ते 7 प्रश्न चुकीचे होते तर काहींच म्हणणं आहे की 7 तारखेला उत्तराची बटण चेक केली तर प्रश्न आणि उत्तर वेगवेगळे होते, 7 तारखेला 52 उत्तर बरोबर होते तर त्यानंतर 67 प्रश्नाची उत्तरे बरोबर होती असे प्रकार आहे. एका परीक्षार्थीने प्रतिक्रिया देतांना सांगितले की जर उत्तर पत्रिकेची “की” चेंज होतं असेल तर ज्यांनी पैसे दिले त्या सेटिंग वाल्यांची “की” पूर्ण प्रश्नाची बरोबर उत्तर करतील त्यामुळे 21 डिसेंबर पासून परीक्षेत झालेला घोळ आता निकाल लागण्याच्या वेळेपर्यंत सुरु असल्याने सिडीसीसी बैंक नोकर भरती घोटाळा आता चव्हाट्यावर आला आहे आणि ज्यांनी नोकरी करिता 25 ते 35 लाख रुपये दिले त्यांनाचं पास करण्याचा प्रकार उघड झाला आहे, या संदर्भात YBD अकॅडेमी चे योगेश धराडे यांनी तयार केलेला व्हिडीओ सर्व परीक्षार्थिनी बघितला तर जिल्ह्यात आणि ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली त्यांच्या जिल्ह्यात आंदोलने होतील एवढा सिडीसीसी बैंक नोकर भरती परीक्षेत घोळ झालेला दिसत आहे.

सिडीसीसी बैंक नोकर भरती घोटाळा हा येथील एकाचा अपवाद वगळता जवळपास सर्वच लोकप्रतिनिधी यांच्या आर्थिक स्रोत चा भाग बनला आहे की काय असाच प्रकार दिसतो, कारण ज्या लोकप्रतिनिधीना जनता निवडून देते त्यांनी जनतेच्या हिताचे निर्णय व्हावे यासाठी जिथे कुठे भ्रष्टाचार होतोय तिथे पुढे येऊन जनतेचं प्रतिनिधित्व करायला हवं पण येथील लोकप्रतिनिधी “भाडं मे जाये जनता अपना काम बनता.” या विचारांचे दिसत आहे, जणू यांना अशाच भ्रष्टाचारातून पैसे कमविण्याची नामी संधी दिसली असावी असे वाटतं आहे, पण त्या बिचाऱ्या गोरगरीब हुशार विदयार्थी ज्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून परीक्षा दिली त्यांचे काय? हा मोठा गंभीर प्रश्न असून त्यांच्या हक्कासाठी आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती द्वारे जे आंदोलन सुरु आहे त्या आंदोलनात सर्व परीक्षर्थिनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

विधानसभेत सिडीसीसी बैंकेच्या परीक्षा घोटाळा काढणारे आमदार आता गप्प कां ?

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीच्या ऑनलाईन परीक्षेत घोळ झाल्याने हजारो परीक्षार्थीनी राज्यातील अनेक जिल्ह्यात आंदोलन केली, चंद्रपूर ची बैंक आणि परीक्षा पुणे नाशिक औरंगावाद सारख्या लांब जिल्ह्यामध्ये कशासाठी हे प्रश्न उपस्थित करून सरकारने या नोकर भरतीची चौकशी करावी व नोकर भरती घेणाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार आणि देवराव भोंगळे यांनी संयुक्तपणे केली, मात्र त्यानंतर होतं असलेला परीक्षा घोळ काही थांबला नाही आणि सरकारने काहीही चौकशी केली नाही, पण आता आमदार किशोर जोरगेवार आणि देवराव भोंगळे हे 31 हजार पेक्षा जास्त परीक्षार्थिना न्याय देण्यासाठी समोर येतील व सरकारला धारेवर धरून भ्रष्ट मार्गाने नोकर भरती केली जातं असल्याने त्यावर कार्यवाही करण्यास सरकारला भाग पाडतील अशी अपेक्षा परीक्षार्थी आणि जिल्ह्यातील जनतेला होती मात्र ते आमदार आता गप्प कां आहे हा प्रश्न उपस्थित होतं आहे, आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती द्वारे सुरु असलेल्या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली खरी पण ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिह्यात येत आहे त्यांचेशी आंदोलनकर्त्यांची भेट घालवून देण्याचे बोलले होते मात्र आता ते फोनच उचलत नसल्याने त्यांचा नेमका काय प्लान आहे हे समजायला मार्ग नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here