Home Breaking News चंद्रपूर भूखंड माफियांची दादागिरी कुणाच्या आशीर्वादाने ?

चंद्रपूर भूखंड माफियांची दादागिरी कुणाच्या आशीर्वादाने ?

चंद्रपूर भूखंड माफियांची दादागिरी कुणाच्या आशीर्वादाने ?

वृंदावन नगर आणि राष्ट्रवादी नगर मधील बोगस लेआऊट पाडून खुलेआम नोटरी द्वारे विक्री, प्रशासन कुंभकर्णी निद्रेत?

भूखंड पंचनामा भाग -5

चंद्रपूर :-  चंद्रपूर शहराच्या वाढत्या लोकसंख्यामुळे व विस्तारामुळे शहरातील भूखंड माफियांनी शहाराच्या लगत असणाऱ्या वृंदावन नगर आणि राष्ट्रवादी नगर भागाकडे मोर्चा वळवला असून या परिसरातील जमिनी ह्या अकृषक होतं नसल्याने प्रशासनाने जाहीर केल्यानंतर भूखंड माफीयांनी या जागेवर बोगस नोटरी द्वारे रजिस्ट्री दाखवून प्लॉट विक्रीचा गोरखधंदा सुरु केला आहे आणि त्यामुळे शेकडो नागरिकांना मामा बनवून हे भूखंड माफिया कोट्यावधीची उलाढाल करत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे, दरम्यान या भागाची पाहणी केली असता या भागात खडीकरण केलेले कच्चे रस्ते सुद्धा नाही आणि एमएसीईबी द्वारे लाईट येत नाही कारण प्लॉट धारकाकडे पक्की रजिस्ट्री नाही आणि टाऊन प्लानिंगचे दास्तावेज सुद्धा नाही,

इरई नदीकाठावरील काही गावांमध्ये भूखंड माफियांचा दबदबा वाढला आहे. या गावांमध्ये – दाताळा, कोसारा, चोराळा, देवाडा, आरवट, हिंगणाळा, शिवणी चोर, बोररीठ, पडोली, खुटाळा, राष्ट्रवादी, तुलसी नगर, वृंदावन नगर इत्यादींमध्ये भूखंड माफिया सक्रिय झाले असून, ते अल्प किमतीत भूखंड विकत घेऊन त्यांना अनधिकृतपणे विकत आहेत. काही ठिकाणी तर विक्री अजूनही सुरू आहे. या विक्रीच्या प्रक्रियेत फसवणूक मोठ्या प्रमाणावर केली जात असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

तहसीलदार विजय पवार यांनी दिले निर्देश: ब्ल्यू लाईनमध्ये विक्रीवर कडक कारवाई

तहसीलदार विजय पवार यांनी स्पष्ट केले की, चंद्रपूरच्या पूरग्रस्त क्षेत्रांमध्ये ब्ल्यू लाईन (पुररेषा) आखलेली आहे आणि या भागात कोणत्याही प्रकारच्या लेआऊट पाडण्यावर कडक कारवाई केली जाईल. इरई नदीकाठावरील भूखंड विक्रीसाठी फसवणूक केली जात आहे. प्रशासनाने रजिस्ट्री व नोटरींना पत्र पाठवून, या प्रकारच्या भूमिकेत भाग घेतलेल्या व्यक्तींच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नागरिकांना सूचना: खोट्या आश्वासनांवर विश्वास न ठेवता, प्रशासनास माहिती द्या

चंद्रपूर प्रशासनाने या प्रकरणाच्या तपासणीला सुरुवात केली असून, दोषी व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रशासनाच्या तपासणीने या प्रकरणात पारदर्शकता आणली आहे, आणि भविष्यात अशा प्रकारच्या अनधिकृत भूखंड विक्रीला प्रतिबंध करण्याचे ठरवले आहे. नागरिकांना या प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खोट्या आश्वासनावर विश्वास न ठेवता, प्रशासनाला तत्काळ माहिती देणे आवश्यक आहे.

नागरिकांचा सहभाग: प्रशासनास सहकार्य करा, भूखंड माफियांविरुद्ध आवाज उठवा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here