माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मनपा आयुक्तांचा निषेध:
एकाच प्रभागात 10-15 सफाई कामगारांची नियुक्ती, शहरातील इतर भाग दुर्लक्षित
चंद्रपूर :- माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आज महानगरपालिका आयुक्तांचे तीव्र निषेध केला आहे. एका प्रभागात 10 ते 15 सफाई कामगारांची तातडीने नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी आयुक्तांची कडक शब्दात टिका केली.
News reporter :- अतुल दिघाडे
चंद्रपूर महानगरपालिकेतील गजानन महाराज प्रगट दिनाच्या (20 फेब्रुवारी) निमित्ताने, मंदिराजवळील नाली सांडपाणी ओवरफ्लो होणारे आहे आणि लाखो भाविक इथे महाप्रसादासाठी येणार आहेत. या परिस्थितीमध्ये, आयुक्त आणि उपायुक्त तिथेच राहतात, तरीही सांडपाणी आणि नाल्याची दुरवस्था सोडवण्यात आलेली नाही.
पप्पू देशमुख यांचे म्हणणे:
“आयुक्त साहेब, जे तुमच्या मदतीने, साधारणपणे एकाच प्रभागात 10-15 सफाई कर्मचारी कार्यरत आहेत, तेच संपूर्ण शहरातील स्वच्छतेसाठी लक्ष देऊन काम कराल, तर शहराचा चेहरा बदलू शकेल. इतर प्रभागात नागरिक, स्वच्छता कर्मचारी, आणि माजी नगरसेवक त्रस्त आहेत. त्यांना योग्य सेवा मिळत नाही.”
याशिवाय, ते म्हणाले, “दहा-बारा सफाई कामगारांची नियुक्ती संबंधित विभाग प्रमुखांना आणि स्वच्छता निरीक्षकांना देखील माहिती नाही. मग प्रश्न आहे, महानगरपालिका कोण चालवत आहे?”
शहरात स्वच्छतेची स्थिती चिंताजनक असून, जनतेच्या हितासाठी मनपा प्रशासनाने तत्काळ योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. पप्पू देशमुख यांनी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना केली की, प्रशासनाला सदबुद्धी मिळो, आणि स्वच्छतेची स्थिती लवकर सुधारली जावी.
# जनसंघर्षअभियान #