Home चंद्रपूर धक्कादायक :- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याच्या नादात आरोपी पोलिसांच्या...

धक्कादायक :- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याच्या नादात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ?

अनाथ मुलीला राजस्थानात विकण्याचा होता बेत !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

अल्पवयीन मुलगी एकटीच घरी असल्याची संधी साधून राजस्थानातल्या एका व्यक्तीने आपल्याच १५  वर्षीय साळीला लग्नाचे आमिष दाखवून व गुण्गीचे औषध देवून पळवून नेण्याच्या तयारीत असतांना मुलीच्या सतर्कतेने आरोपी हरीराम कण्डेरा राहणार राजस्थान राज्यातील सवाई माधव जिल्हा येथील व्यक्तीवर मुलीच्या बयानावरून कलम 366 366 (A )328 व 511  अंतर्गत रामनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीत अल्पवयीन मुलगी ही तिची आत्या हिच्या तूकूम मधील घरी राहत होती व घटनेच्या दिवशी ती घरी एकटीच होती.विशेष म्हणजे पिडीत मुलगी हिचे आईवडील हे लहानपणीच मरण पावल्याने ती  काका आणि आत्याकडे राहत होती, अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा बेत असलेल्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केल्यामुळे शहरात एकच  खळबळ उडाली आहे. राजस्थान मधील पिडीत अल्पवयीन मुलीचा भावजीच या प्रकरणी दोषी असल्याने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संदर्भात रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून याअगोदर सुद्धा अशी घटना आरोपीनी केली काय ? याबाबत तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार प्रकाश हाके यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here