Home कोरपणा कोरपना नगरीत घनकचरा व्यवस्थापनाचा फज्जा ?

कोरपना नगरीत घनकचरा व्यवस्थापनाचा फज्जा ?

मुख्याधिकारी गप्प कंत्राटदारांची मात्र बल्ले बल्ले ! 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

कोरपना नगरपंचायत क्षेत्रात गेल्या तीन वर्षापासून एकाच कंत्राटदाराची मक्तेदारी आहे, मात्र तो कंत्राटदार कोण हे गावकऱ्यांना व कामगारांना पत्ताच नाही,  करारनाम्यानुसार कंत्राटदार कार्य करीत नसून घंटागाडी वाहतूक वाहन व कचराकुंड्या अस्तावस्त पडल्या असून नगरपंचायतीच्या कामगारांचा वापर हा कार्यालयीन कामकाजासाठी केल्या जात आहे, कराराप्रमाणे अंमलबजावणी होत नसल्याचे मुख्य अधिकारी यांच्याकडे यापूर्वी नगरसेवकांनी तक्रारी करून लक्ष वेधले, मात्र मुख्य अधिकारी यांचे नियंत्रण नसल्यामुळे व याबाबत आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, व  मुख्याधिकारी कधीच नगरात फेरफटका मारून आढावा घेत नाही आणि  काढलेला गाळ घनकचरा सांडपाणी नियमित सफाई होत नाही व ज्या ठिकाणी गाळ काढून आहे ते पंधरा पंधरा दिवस उचल केल्या जात नाही, अनेक नाल्या सांडपाणी व केअर कचऱ्यामुळे तुडुंब भरले असून यामुळे गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला व गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, सध्या देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन गंभीर असताना कोरपना नगरपंचायती मध्ये कामगारांचे शोषण व घनकचरा वाहतुकीचे कामात दिरंगाई,  सफाई कामगारांची अल्पसंख्या असल्याने सफाई कामाकडे दुर्लक्ष, करारनाम्या पेक्षा कमी मजुरांचा वापर,  दैनिक कामाच्या नियोजनाचा अभाव, यामुळे नगरपंचायतीच्या अधिकारांचा नियंत्रण नसल्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा फज्जा उडाला आहे कंत्राटदाराने अटी व शर्तीचा भंग केला असून जबाबदारी पार पाडत नसताना व यापूर्वी कंत्राटदाराच्या कामाच्या दिरंगाई व मनमानी कारभाराच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी असताना नव्याने पुन्हा त्यात कंत्राटदाराला काम देण्यामागचे गुढ काय ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित करीत आहे, गेल्या दोन वर्षात कामात गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी झाल्या पुन्हा मात्र ई-टेंडरिंग नियोजनबद्ध पद्धतीने तंत्राचा वापर करून त्यात कंत्राटदाराला देण्यामागे कारण काय?  नगरपंचायत पदाधिकारी अधिकारी यांच्या संगनमतातून घनकचरा व्यवस्थापन कामात “दाल मे कुछ काला है”असच घडत असल्याचा गावकऱ्यांचा रोष आहे, त्यामुळे मुख्याधिकारी कंत्राटदारांच्या कारभाराची कर्तव्य म्हणून व जबाबदारी म्हणून आढावा घेतील काय ? असा सवाल नागरिकांनी केला असून गावामध्ये ठिकाणी केरकचरा नालीतील गाळ  पडलेला असून अनेक वार्डातील नाल्या तुडूंब भरल्या आहे अनेक प्रभागांमध्ये कंत्राटदारांनी कामगार नियुक्त  केलेच नाही तसेच करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कामगारांना मानधन दिला जात नाहि व त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध झालेला नाही किमान वेतन कायद्याची पायमल्ली करत तुटपुंजे मानधन देऊन कामगारांचे कंत्राटदार शोषण करीत आहे,  राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा गोंडपिपरी गडचादुर जिवती येथील नगर परिषद व नगरपंचायती नऊ ते बारा हजार रुपये पगार देत असताना कोरपणा येथे मात्र 3500 रुपये मानधन देऊन कामगाराच्या तोंडाला पाने  पुसल्या जात आहे याबाबत तातडीने दखल घेऊन नगर प्रशासन अधिकारी नगराच्या भोंगळ कारभारावर व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे

Previous articleग्राहक पंचायत महाराष्ट्र चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित…
Next articleखतरनाक अपघात :-पडोली पोलिस स्टेशन समोरच शाळकरी मुलाचा अपघातात दुर्दैवी म्रुत्यु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here