Home चंद्रपूर संतापजनक:- RTO चंद्रपूर कार्यालयात भ्रष्टाचाराचा पुन्हा एक पुरावा ऑडिओ द्वारे आला समोर.

संतापजनक:- RTO चंद्रपूर कार्यालयात भ्रष्टाचाराचा पुन्हा एक पुरावा ऑडिओ द्वारे आला समोर.

किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्या भ्रष्टाचाराने सर्वसामान्य वाहनधारकां मध्ये मोठा संताप, मनसे वाहतूक सेनेचीं मुंबई येथे परिवहन आयुक्तांना तक्रार.

RTO चा पंचनामा भाग-14

चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून येथे येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांना येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आणि आंनद मेश्राम यांना येथील दलाला मार्फत लाच दिल्याशिवाय कुठंलही काम होतं नसल्याने वाहन धारकांमध्ये मोठा संताप व्यक्त होतं असतांना आता चक्क एका ड्रायविंग स्कुल च्या एजंट ने लर्निंग, पर्मनंट आणि हेवी लायसन्सचीं रजिस्ट्रेशन फी एका ग्राहकाला सांगताना शासकीय दराच्या पाच ते आठ पट फी सांगितल्याने यामध्ये किरण मोरे आणि आनंद मेश्राम चा या ड्रायविंग स्कुल एजंट मार्फत काय पैशाचा लफडा आहें हे स्पष्ट होतं आहें. दरम्यान काल दिनांक 3 एप्रिल ला राज्याचे परिवहन आयुक्त यांच्याकड़े मनसे वाहतूक सेने तर्फे निवेदन देण्यात आले असून किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्या भ्रष्टाचाराची पोल मनसेचे मुंबई येथील पदाधिकारी खोलणार असल्याची माहिती हाती आली आहें.

व्हायरलं एका ऑडिओ वरून ग्राहक आणि एका ड्रायविंग स्कुल च्या एजंट चा जो संवाद झाला त्यात ग्राहकांनी हेवी लायसन्स काढण्याबाबत ड्रायविंग स्कुल च्या एजंट ला विचारले असता तो एजंट म्हणाला की तुम्हांला हेवी लायसन्स काढायचं असेल तर अगोदर लर्निंग आणि पर्मनंट लायसन्स काढावं लागेल त्यासाठी तुम्हांला 5000/- रुपये फी लागेल आणि एका वर्षाने तुम्ही मग हेवी लायसन्स काढाल तेंव्हा 8000/- रुपये द्यावे लागेल, जेंव्हा की शासनाच्या लायसन्स फी नुसार लर्निंग 200/- पर्मनंट करिता 300/- नूतनीकरण करिता 200/- रुपये दर असतांना या कार्यालयात लर्निंग आणि पर्मनंट लायसन्स मिळून चक्क 5000/- रुपये घेतल्या जातं आहें, तर हेवी लायसन्स करिता 8000/- रुपये भरावे लागतात, जे ट्रक ड्राइवर महिन्याला 10,000/- रुपये कमावितात त्यांना चक्क 8000/- RTO कार्यालयात लायसन्स करिता भरावे लागतं असेल आणि ते सुद्धा किरण मोरे आणि आंनद मेश्राम यांचे एजंट मार्फत खिसे भरण्यासाठी असेल तर यांच्यावर शासनाने कारवाई करायला हवी, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी ते मंत्री आणि आयुक्त कार्यालयापर्यंत ह्या भ्रष्टाचाराचा पैसा पोहचविल्या जातं असेल तर मग यांच्यावर कोण कारवाई करणार? हा यक्ष प्रश्न असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे मुंबई पदाधिकारी आता यावर पुराव्यासह परिवहन आयुक्त यांच्या कार्यालयात एक अभिनव आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहें. या संदर्भात नुकतेच निवेदन परिवहन आयुक्त मुंबई कार्यालयात दिनांक 3/4/2025 ला देण्यात आले आहें.

आता हेवी लायसन्स काढायचं असेल तर ड्रायविंग स्कुल एजंट कडे का?

चंद्रपूर RTO कार्यालय हे किरण मोरे आणि आनंद मेश्राम या अधिकाऱ्यांनी पूर्णतः भ्रष्ट बनवलं असून एजंट च्या माध्यमातून अवैध वसुली सुरु आहें, मागील काही दिवसापासून RTO चा पंचनामा मालिका भूमिपुत्राची हाक या न्यूज पोर्टल वर प्रकाशित होतं असून त्यात किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्या भ्रष्टाचाराच्या अनगीनत कहाण्या जनतेचे लक्ष वेधून घेत आहें अशातच आता RTO कार्यालयात एजन्ट जास्त दिसू नये यासाठी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी नवी युक्ती शोधली असून हेवी लायसन्स काढण्यासाठी केवळ ड्रायविंग स्कुलच्या संचालक एजन्ट ला परवानगी दिली आहें आणि कार्यालयाबाहेर जे एजंट आपली रोजी रोटी करिता काम करतात त्यांना आता हेवी लायसन्स चे काम मिळणार नाही आणि जिथे 3000/- रुपयात काम व्हायचे तेथे 5000/- आणि जिथे 5000/- रुपयात काम व्हायचे तिथे 8000/- रुपये वाहन धाराकांना स्वतःच्या लायसन्स करिता मोजावे लागणार, महत्वाची बाब म्हणजे खाजगी एजंट नेमण्याचा अधिकार RTO अधिकाऱ्यांना नसताना व लायसन्स संदर्भात सरळ त्यांचे दर पत्रक खाजगी ड्रायविंग स्कुल चे संचालक यांना सांगण्याचा कुठंलाही अधिकार नसताना हे कुठल्या अधिकाराने ग्राहकांना दर सांगतात हे कळायला मार्ग नसून त्यांना लायसन्स बनवण्याची प्रक्रिया करण्याचे काम ह्याच मोरे आणि मेश्राम यांनी दिले असल्याने त्यात यांचा किती हिस्सा आहें हे पाहणे सुद्धा महत्वाचे आहें, दरम्यान एका ड्रायविंग स्कुल एजंट सोबत ग्राहकांचे झालेले संभाषण याची चौकशी व्हायला हवी आणि RTO कार्यालयात सुरु असलेला भ्रष्टाचार बंद व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे परिवहन आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारीचे निवेदन दिले असल्याने आता मोरे आणि मेश्राम वर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here